तेलंगणा सीमा सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:26+5:30

सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींची खात्री केल्यानंतर प्रवाशांना यवतमाळच्या रस्त्यांवर पुढचा प्रवास करता येणार आहे.

Telangana border seal | तेलंगणा सीमा सील

तेलंगणा सीमा सील

ठळक मुद्देप्रवाशांची तपासणी : परदेशातून आलेले २० जण वसतिगृहात क्वॉरंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेलंगणाची सीमा सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित नसल्याची खात्री पटल्यानंतरच तेलंगणातील प्रवाशांना यवतमाळात प्रवेश मिळणार आहे.
या सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींची खात्री केल्यानंतर प्रवाशांना यवतमाळच्या रस्त्यांवर पुढचा प्रवास करता येणार आहे. या मार्गावरील प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे.
मुंबई आणि नागपूर विमानतळावर उतरलेल्या २० जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. होम क्वॉरंटाईन झालेल्या नागरिकांपैकी काही रस्त्यावर दिसल्याची माहिती पुढे आली आहे. अशा नागरिकांना धामणगाव मार्गावरील वसतिगृहात निर्माण केलेल्या कक्षात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले.

तीन विवाह पाहुण्यांशिवाय
गुरूवारी शहरात तीन विवाह आयोजित होते. मात्र १४४ कलम लागू असल्याने या विवाहांचे नियोजित ठिकाण रद्द करण्यात आले. वधु, वर आणि आईवडील, भाऊ, बहीण यांच्या उपस्थितीत हे लग्न उरकविण्यात आले. यावेळी वर आणि वधूनेही चेहऱ्याला मास्क लावले होते.

चर्चमध्ये प्रार्थना थांबली
यवतमाळच्या मातृचर्चमध्ये होणारी सामूहिक प्रार्थना कोरोनाच्या धास्तीने थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टळेपर्यंत प्रार्थना होणार नसल्याचे मातृचर्चच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Telangana border seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.