राँग नंबर डायल केला, म्हणून बालकावर ब्लेडने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 14:01 IST2021-12-12T13:13:18+5:302021-12-12T14:01:51+5:30

चुकीने दोन वेळा दुसऱ्याचाच मोबाइल क्रमांक डायल करण्यात आला. यामुळे संतापलेल्या बालकाने दुसऱ्या बालकावर थेट ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी केले.

a teen attacked with a blade by another teen due to dialed wrong number twice | राँग नंबर डायल केला, म्हणून बालकावर ब्लेडने वार

राँग नंबर डायल केला, म्हणून बालकावर ब्लेडने वार

यवतमाळ : कोणाला कशाचा राग येईल, हे सांगता येत नाही. चुकीने दोन वेळा दुसऱ्याचाच मोबाइल क्रमांक डायल करण्यात आला. यामुळे संतापलेल्या बालकाने दुसऱ्या बालकावर थेट ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना महेश भवनसमोर गुरुवारी रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडली.

समर्थवाडी परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षीय बालकाने मोबाइलवरून नंबर डायल केला. त्याचा फोन एका मुलीने उचलला व तो राँग नंबर असल्याचे सांगितले. यानंतर, त्या बालकाने कॉल कट केला. नंतर काही वेळाने पुन्हा त्या बालकाने मोबाइलवरून नंबर डायल केला. तो नंबर राँग असल्याचे सांगण्यात आले. मात्र, सतत फोन का करतो, असे विचारत, त्याचा शोध घेऊन एका १७ वर्षीय बालकाने थेट ब्लेडने गालावर, उजव्या हातावर वार केले. यात तो बालक गंभीर जखमी झाला.

ही घटना महेश भवनच्या बाजूला घडली. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यावरून १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकरणाची सर्वत्र चर्चा पसरली. नेमकी चूक कोणाची हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Web Title: a teen attacked with a blade by another teen due to dialed wrong number twice