विद्यार्थिनीवर वर्गात अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला चोपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST2021-08-08T05:00:00+5:302021-08-08T05:00:43+5:30

अरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शाळा बंद असल्यानंतरही शिक्षक अतिरिक्त वर्ग घेत होता. बऱ्याचदा रविवारीही हा शिक्षक शाळेतच दिसत होता. शनिवारीसुद्धा दुपारी १.३० वाजता शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी धडक दिली. तेव्हा त्याचे गैरकृत्य उघड्या डोळ्याने दिसले. ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

The teacher who abused the student in the classroom was beaten | विद्यार्थिनीवर वर्गात अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला चोपले

विद्यार्थिनीवर वर्गात अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला चोपले

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/मंगरूळ : प्राथमिक शाळेतील ५५ वर्षीय शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीला नादी लावले. सलग दोन वर्षापासून हा प्रकार सुरू होता. ती मुलगी महाविद्यालयात गेल्यानंतरही शिक्षक तिला  क्लासच्या बहाण्याने शाळेत बोलवत होता. याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. शनिवारी या शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. ग्रामस्थांनी त्याला बेदम चोप दिला. शेवटी ग्रामीण पोलिसांनी बळाचा वापर करून शिक्षकाची सुटका केली.
अरुण राठोड (५५) रा.जवळा हा शिक्षक बेलोरा ता.यवतमाळ येथील जिल्हा परिषद शाळेवर चार वर्षापासून कार्यरत आहे. वर्गातील विद्यार्थिनीसोबत त्याचे गैरवर्तन सुरू असल्याचा संशय ग्रामस्थांना होता. शाळा बंद असल्यानंतरही शिक्षक अतिरिक्त वर्ग घेत होता. बऱ्याचदा रविवारीही हा शिक्षक शाळेतच दिसत होता. शनिवारीसुद्धा दुपारी १.३० वाजता शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी धडक दिली. तेव्हा त्याचे गैरकृत्य उघड्या डोळ्याने दिसले. ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. शिक्षकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान घटनेची माहिती पोलीस पाटलांनी ग्रामीण पोलिसांना दिली. ठाणेदार किशोर जुनगरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार पथकासह बेलोरा येथे पोहोचले. मात्र कृत्यामुळे संतापलेले ग्रामस्थ शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी परिस्थिती ओळखून बळाचा वापर करत अरुण राठोड याची जमावाच्या तावडीतून सुटका केली. विद्यार्थिनीला व   अरुण राठोड याला शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भेट दिली. पीडित मुलीच्या आई-वडिलांशी त्यांनी चर्चा केली. पीडितेच्या वडिलाच्या तक्रारीवरून कलम ३७६, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला.

शिक्षकाची दुचाकी पेटवून दिली 
अरुण राठोड याला शाळेत डांबून ग्रामस्थ चोप देत असल्याची माहिती मिळताच जवळा येथून त्याचा भाऊ बेलोरा येथे पोहाेचला. त्यालाही ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. दरम्यान काही नागरिकांनी अरुण राठोडच्या भावाला तेथून जाण्यास सांगितले. संतप्त जमावाने अरुण राठोडची दुचाकीही पेटवून दिली. काही काळ बेलोरा येथे तणावाचे वातावरण होते.

 

Web Title: The teacher who abused the student in the classroom was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.