रात्री सुसाईड नोट व्हॉट्सअॅपवर व्हायरल; सकाळी शेतात गळफास लावून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 19:34 IST2019-05-28T19:33:05+5:302019-05-28T19:34:30+5:30
यवतमाळच्या महागावमधील धक्कादायक घटना

रात्री सुसाईड नोट व्हॉट्सअॅपवर व्हायरल; सकाळी शेतात गळफास लावून आत्महत्या
यवतमाळ : आदल्या रात्री चिठ्ठी लिहून दुसऱ्या दिवशी आत्महत्या केल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यात घडली. बिजोरा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अनिल गावंडे यांचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या स्थिती आढळून आला. आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदारी धरू नये, असं त्यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या अनिल गावंडे यांनी उटी या गावात शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. त्याआधी त्यांनी सुसाईड नोट लिहिली. आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरलं जाऊ नये, असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं. ही चिठ्ठी त्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हायरल केली. रात्री आठच्या सुमारास अनेकांच्या वाचनात ही चिठ्ठी आली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला.