शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या ‘जलभूषण’ पुरस्कारावरून तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

१४ जुलै २०२० रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ‘जलभूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही. मात्र राज्य शासनाने यापूर्वीच जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ‘जलसंधारण दिन’ जाहीर केला होता.

ठळक मुद्देपुसद तालुक्यात नाम बदलाला विरोध, अध्यादेश रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्यासंबंधीचा अध्यादेश शासनाने काढला. मात्र संपूर्ण राज्यात जलक्रांती व जलसंधारणाचे कार्य माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांनीच केले. त्यामुळे ‘तो’ अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी येथील बंजारा समाज व विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.राज्य शासनाने १२ जून २०२० रोजी अध्यादेश काढला. १४ जुलै २०२० रोजी माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ‘जलभूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन झाले नाही. मात्र राज्य शासनाने यापूर्वीच जलक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या नावाने दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ‘जलसंधारण दिन’ जाहीर केला होता.सुधाकरराव नाईक यांनी अथक परिश्रम घेऊन राज्यात जलक्रांती केली. त्यांनी जलचळवळीला जनचळवळीचे स्वरूप दिले होते. राज्यात त्यांना जलक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. मात्र आता दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पुरस्कार देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. हा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा श्रेयवाद निर्माण करण्याचा प्रकार असल्याची भावना तालुक्यातील बंजारा बांधव व विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.विविध सामाजिक संघटनांचा विरोधराज्य शासनाने काढलेला १२ जूनचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी बंजारा समाज बांधव व विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. यावेळी मनीष जाधव, प्रा.संजय चव्हाण, सिम्पल राठोड, पंजाब चव्हाण, राजाराम राठोड, के.डी. राठोड, कमलसिंग राठोड, अरविंद चव्हाण, प्रा.उल्हास चव्हाण, जयसिंग राठोड, अ‍ॅड.दिनेश राठोड, श्रीकांत चव्हाण, संजय आडे, अविनाश राठोड, विकास राठोड, साहेबराव चव्हाण, राम राठोड, अर्जुन राठोड, विजय जाधव आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व बंजारा समाज बांधव उपस्थित होते.जलक्रांतीने जागविल्या स्मृतीदिवंगत सुधाकरराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात जलक्रांतीची चळवळ राबविली. त्यामुळेच त्यांना राज्यभर जलक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्मृतिदिनी जलभूषण पुरस्कार दिला जातो. त्यातून त्यांच्या स्मृती जागविल्या जातात. आता नाम बदलावरून वादंग पेटले आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार