शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
4
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
5
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
6
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
7
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
8
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
9
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
10
सीबीएसईचा विद्यार्थ्यांना दिलासा; पुनर्मूल्यांकन शुल्कात मोठी कपात
11
यूएईमध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; युद्ध भडकण्याची चिन्हे
12
‘गुलदार’ समुद्रतळाशी स्थापित करण्यास आज प्रारंभ; अंडरवॉटर म्युझियम, आर्टिफिशिल रीफ आकर्षण
13
मामाला भेटायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार
14
बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव; एबीसी आयडी सादर न केल्याने विद्यापीठाचे पाऊल
15
संपादकीय: आपत्तीच्या दशकाची डायरी
16
बेजबाबदार परीक्षा यंत्रणांना लाज कशी वाटत नाही?
17
राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; सुटला तलाठ्याचा फेरा, ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपचा वाढला वापर
18
विधान परिषदेत ठाकरेंची केवळ ३१.५८% उपस्थिती ; सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर
19
माणसांची सुट्टी! एआय स्वतःच स्वतःला देणार जन्म; 'रिकर्सिव्ह सुपरइंटेलिजन्स'ला मोठा निधी
20
केरळमध्ये सतीशन यांचा 'अल्ट्रा मॉडर्न' फॉर्म्युला! २० पैकी १४ मंत्री नवे चेहरे, आज शपथविधी होणार
Daily Top 2Weekly Top 5

वेमुला आत्महत्याप्रकरणी कारवाई करा

By admin | Updated: January 25, 2016 03:43 IST

हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी

यवतमाळ : हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, विधान परिषद सदस्य रामचंद्र राव, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पाराव पांडिले आणि अभाविपचे सुशीलकुमार, कृष्णा चैतन्य यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. सखोल चौकशी करून अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, रोहीतच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. या संदर्भात तत्काळ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
निवेदन देतेवेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष तारीक साहीर लोखंडवाला, दयानंद बनसोड, शेख महेबूब आलम, बळीराम नेवारे, नगरसेविका ज्योती खोब्रागडे, प्रकाश राऊत, लक्ष्मण पाटील, प्रफुल्ल शंभरकर, सुनील बोरकर, संजय तरवरे, शैलेश गाडेकर, या.वा. तलवारे, रूपेश टिपले, अ‍ॅड.प्रभाकर कांबळे, डॉ. सिद्धार्थ पाटील, विनोद सोनोने, हेमंत कांबळे, देवेंद्र गणवीर, सुनील रामटेके, विलास भवरे, सुनील वाघमारे, हरिदास सुखदेवे, गौतम रामटेके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)