शेतशिवारात युवकाचा संशयास्पद मृत्यू

By रवींद्र चांदेकर | Updated: September 30, 2023 19:52 IST2023-09-30T19:52:14+5:302023-09-30T19:52:31+5:30

संतोष वाणी यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत गावामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.

Suspicious death of a youth in a farm | शेतशिवारात युवकाचा संशयास्पद मृत्यू

शेतशिवारात युवकाचा संशयास्पद मृत्यू

यवतमाळ: महागाव तालुक्यातील पोखरी-इजारा परिसरामध्ये एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११:०० वाजता उघडकीस आली.

संतोष दत्ता वाणी (३२), असे मृत युवकाचे नाव आहे. त्यांचा संशयास्पद स्थितीमध्ये मृतदेह आढळून आला. शुक्रवारी ते घरून निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. शनिवारी पोखरी शिवारातील संतोष पांडुरंग पवार यांच्या शेत सर्व्हे नंबर ६१ आणि नितीन शामसुंदर चिद्दरवार यांच्या शेत सर्व्हे नंबर ५८ या सामायिक धुर्यावर सोयाबीन पिकामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

संतोष वाणी यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत गावामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. तलाठ्याने तहसीलदारांना सादर केलेल्या अहवालानुसार संतोष दत्ता वाणी यांच्या कुटुंबामध्ये पत्नी विशाखा (३०), मुलगी ईश्वरी (४), वडील दत्ता (५५), आई सुशीला (५०), भाऊ संदीप   (२५), असा परिवार आहे.

Web Title: Suspicious death of a youth in a farm