शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’नेच दिलेल्या ओळखपत्रावर संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

शासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विविध पुरस्कार प्राप्त नागरिक, दिव्यांग, गंभीर आजार आदी प्रकारच्या नागरिकांना प्रवाशांना सवलत प्रवास देत आहे. यासाठी संबंधित विभागाकडून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे महामंडळाकडून प्रवास सवलतीचे ओळखपत्र दिले जाते.

ठळक मुद्देठोस कारण सांगतच नाही : आता वाहक देतात मेडिकल प्रमाणपत्र बाळगण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुद्द महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) दिलेले प्रवास सवलतीचे ओळखपत्रही बोगस ठरविले जात आहे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता प्रवाशांना तिकीटाचा भुर्दंड दिला जात आहे. आता तर सवलतधारकांना मेडिकल प्रमाणपत्र बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. यावरून एसटी कर्मचारी महामंडळाच्या कामावरही साशंक असल्याचे स्पष्ट होते.शासनाच्या माध्यमातून एसटी महामंडळ ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, विविध पुरस्कार प्राप्त नागरिक, दिव्यांग, गंभीर आजार आदी प्रकारच्या नागरिकांना प्रवाशांना सवलत प्रवास देत आहे. यासाठी संबंधित विभागाकडून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे महामंडळाकडून प्रवास सवलतीचे ओळखपत्र दिले जाते. मात्र अलीकडे बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सवलतीत प्रवास करण्याचे प्रमाण वाढले असल्याची ओरड केली जात आहे. काही प्रकरणात याविषयी कारवाईसुद्धा करण्यात आली. काही अधिकाऱ्यांवर रिकव्हरी निघाली. याचाच सूड म्हणून की काय, खुद्द एसटीने प्रमाणित केलेले ओळखपत्रही बोगस ठरविले जात आहे.दिव्यांगांना मेडिकल बोर्डाच्या प्रमाणपत्राच्या आधारे समाज कल्याण विभागाकडून प्रमाणित झाल्यानंतर एसटीची प्रवास सवलत प्रदान केली जाते. अनेक नागरिकांनी अतिशय प्रामाणिकपणे ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. या प्रामाणिक लोकांवरही महामंडळाच्या काही वाहकांकडून बोगसचा ठपका ठेवला जात आहे. यासाठी कारण मात्र स्पष्टपणे सांगितले जात नाही. बोगस आहे एवढे सांगूनच या प्रवाशांना तिकीट काढण्याची सक्ती केली जाते. कार्डातील नेमका बोगसपणा कोणता हे सांगण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहकांना आवश्यक त्या सूचना करणे अपेक्षित आहे.कर्मचाºयांच्या चुका, विद्यार्थ्यांना त्रासविद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया सवलत पासमध्ये अनेक प्रकारच्या चुका कर्मचाऱ्याकडून ठेवल्या जात आहे. काही वाहकांकडून या चुकांचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर बसविला जात आहे. तारीख चुकीची नोंदविणे, अधिकाऱ्याचा शिक्का नसणे आदी प्रकार घडले आहेत. बसमधून उतरविण्यापर्यंतची कारवाई काही वाहकांकडून केली जात आहे. यासाठी काळजीपूर्वक काम करण्याची तसदी महामंडळाच्या कर्मचाºयांनी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक