शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची शरणागती

By admin | Updated: September 22, 2014 23:25 IST

विधानसभेत राष्ट्रवादीच्या मदतीची गरज भासेल या एकमेव स्वार्थापोटी जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रवादीपुढे शरणागती पत्करल्याचे विदारक चित्र रविवारी जिल्हा परिषदेत पहायला मिळाले.

जिल्हा परिषद: आमदारांच्या स्वार्थाने हुकविली कार्यकर्त्यांची संधीयवतमाळ : विधानसभेत राष्ट्रवादीच्या मदतीची गरज भासेल या एकमेव स्वार्थापोटी जिल्ह्यातील काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रवादीपुढे शरणागती पत्करल्याचे विदारक चित्र रविवारी जिल्हा परिषदेत पहायला मिळाले. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार हे निश्चित होते. मात्र अध्यक्ष काँग्रेसचा व्हावा म्हणून पाचही आमदारांकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. वास्तविक काँग्रेसकडे सर्वाधिक २२ सदस्य आहेत. मात्र युद्धापूर्वीच काँग्रेस आमदारांनी राष्ट्रवादीपुढे शस्त्रे टाकली. यामागे पाचही आमदारांचा वैयक्तिक स्वार्थ दिसून आला. कारण तीन आठवड्यांनी विधानसभेची निवडणुक होत आहेत. त्यासाठी आघाडी झाल्यास काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत लागणार आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. तर पुसद या एकमेव जागेवर राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार राहील. ही आमदारकी कायम ठेवण्यासाठी कोणतीही तडजोड स्वीकारण्यास काँग्रेसचे पाचही आमदार तयार आहेत. राष्ट्रवादीला बिनशर्त अध्यक्षपद बहाल करणे हा या तडजोडीचाच एक भाग मानला जातो. आमदारांची ही भूमिका पाहता एखादवेळी राष्ट्रवादीने उपाध्यक्ष पदही स्वत:साठी मागितले असते तर काँग्रेसने त्याला फार काही विरोध केला नसता, असा अंदाज राजकीय क्षेत्रात वर्तविला जात आहे. विधानसभेच्या राजकारणापायी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर पाणी सोडल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. यवतमाळ हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा गृहजिल्हा आहे. सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आहेत. त्यातही दोघांकडे लालदिवा आहे. विद्यमान आमदारांपैकी तीन जण दीर्घ अनुभवी आहेत. काँग्रेसची एवढी अनुभवी फौज आणि सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा न सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आमदारांनी केवळ आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मिळणारा अध्यक्षपदाचा सन्मान, संधी हिरावून घेतल्याचा संतप्त सूर काँग्रेसच्याच गोटातून ऐकायला मिळत आहे. यातील काँग्रेसच्या एका अभ्यासू आमदाराने मात्र राष्ट्रवादीपुढे एवढे नमते घेण्याची आवश्यकता नाही, अशी ताठर भूमिका मांडली होती. मात्र अन्य आमदारांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. नेत्यांच्या या स्वार्थी वृत्तीविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पहायला मिळत आहे. आता सभापती निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)