शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यातील ऊस उत्पादक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

पूर्वीचा हा सहकारातील साखर कारखाना भैरवनाथ ठोंबरे यांनी तीन वर्षांपासून विकत घेतला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तरला होता. तालुक्यात सिंचन व्यवस्था व कसदार जमीन असल्याने उसाचे क्षेत्र बऱ्या प्रमाणात आहे. वास्तविक या तीन तालुक्यातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यामुळे हा साखर कारखाना विकल्या गेला अन् नाही चालला, तर या विभागातील ऊस शेतकरी देशोधडीला लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील गुंज-सवना साईटवर असलेला नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज हा कारखाना विक्रीस काढण्यात आला असून दोन दिवसांपूर्वी निविदा निघाली आहे. त्यामुळे महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत पडले आहेत.पूर्वीचा हा सहकारातील साखर कारखाना भैरवनाथ ठोंबरे यांनी तीन वर्षांपासून विकत घेतला होता. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तरला होता. तालुक्यात सिंचन व्यवस्था व कसदार जमीन असल्याने उसाचे क्षेत्र बऱ्या प्रमाणात आहे. वास्तविक या तीन तालुक्यातील तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यामुळे हा साखर कारखाना विकल्या गेला अन् नाही चालला, तर या विभागातील ऊस शेतकरी देशोधडीला लागणार आहे.खासगी कंपनी भलेही हा साखर कारखाना विकण्याचा निर्णय घेत असेल, तरी हा कारखाना अविरत सुरू राहावा अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बंद असलेला हा साखर कारखाना ठोंबरे यांनी विकत घेतल्यानंतर ऊस उत्पादक शेतकºयांनी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढविले. त्यामुळे तालुक्याची ही कामधेनू परत बंद पडली तर ‘आली सुगी फुगले गाल.. गेली सुगी मागचे हाल’ ही परिस्थिती शेतकºयांवर ओढविण्याची भीती आहे.चेअरमन यांनी हा कारखाना विक्रीसंदर्भात फेरविचार करावा, अशी ऊस उत्पादक शेतकºयांकडून मागणी होत आहे. कारखाना क्षेत्रात पाण्याची मुबलक व्यवस्था आहे, विजेचा प्रश्न नाही, कामगारांचा प्रश्न नाही, पाहिजे तेवढा ऊस साठा आहे. मग हा कारखान विकून आम्हाला कशाला देशोधाडीला लावताय साहेब? हा कारखाना विकू नका हो.. असा टाहो महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी फोडत आहेत.गाळप हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्याने जवळपास पाच कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांनी चिंता करू नये. ठरल्या वेळेत कारखाना सुरू होईल. विक्री संदर्भात निविदा प्रकाशित झाली असून बºयाच गोष्टी शिल्लक आहे.- डी. एल. कदम, जीएम,नॅचरल शुगर युनिट नंबर २ गुंज

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने