विद्यार्थ्यांना लर्निंग फ्रॉम होमची सक्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:22+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात होणार होत्या. त्यामुळे त्यांचे फार शैक्षणिक नुकसान झाले नाही. तसेही सध्या उन्हाळी सुट्या दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सुट्यांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.

Students should not be forced to learn from home | विद्यार्थ्यांना लर्निंग फ्रॉम होमची सक्ती नको

विद्यार्थ्यांना लर्निंग फ्रॉम होमची सक्ती नको

ठळक मुद्देशिक्षकांना विम्याचे कवच द्या : प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सुट्यांचा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा आणि कोरोना परिस्थितीमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकांना विम्याचे कवच मिळावे यासह इतर मागण्यांसाठी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघ सरसावला आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात होणार होत्या. त्यामुळे त्यांचे फार शैक्षणिक नुकसान झाले नाही. तसेही सध्या उन्हाळी सुट्या दरवर्षीप्रमाणे सुरू आहे. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून उन्हाळी सुट्यांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांचे बहुतेक पालक मोलमजुरी, शेतमजुरी करून जगणारे आहे. लॉकडाऊनमुळे ते मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यांच्याकडे कोणत्याही स्मार्ट फोनची व्यवस्था नाही. ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी नेटवर्कचा प्रश्न आहे. साधे मोबाईल रिचार्जअभावी बंद पडले आहे. या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांना लर्निंग फ्रॉम होमची सक्ती करू नये, असे म्हटले आहे.
कोरोनामय परिस्थितीत अनेक शिक्षक कर्तव्य बजावत आहे. त्यांना आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे विम्याचे कवच द्यावे, शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषद शाळांना हँडवॉश व साबणाचा पुरवठा करून शालेय परिसर संबंधित ग्रामपंचायत मार्फत सॅनिटायझर करून द्यावा, शालेय पोषण आहार बिल प्रत्यक्ष मुख्याध्यापकाच्या खात्यात जमा न होता केवळ मॅसेज येत आहे. या प्रकाराची चौकशी करून कारवाई व्हावी, सहाव्या वेतन आयोगाचे काही शिक्षकांचे प्रलंबित हप्ते जमा करावे, प्रलंबित चट्टोपाध्याय प्रकरणे निकाली काढावी आदी मागण्या करण्यात आल्या आहे.
यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजुदास जाधव यांच्या नेतृत्त्वात शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांना निवेदन दिले. यावेळी आसाराम चव्हाण, श्रीराम जिड्डेवार, रविनाश राठोड आदी उपस्थित होते.

Web Title: Students should not be forced to learn from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.