आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2015 02:16 IST2015-09-12T02:16:52+5:302015-09-12T02:16:52+5:30

झरी तालुक्यातील शिबला येथील निवासी आश्रमशाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून तालुक्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करतात.

The students of the ashram school are on the wind | आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर

आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर

शिक्षकांचे अप-डाऊन : शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या जागाही रिक्तच, वरिष्ठांचे होतेय दुर्लक्ष
वणी : झरी तालुक्यातील शिबला येथील निवासी आश्रमशाळेतील काही शिक्षक विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून तालुक्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करतात. त्यामुळे शिक्षणाची आबाळ होत आहे. सोबतच शिक्षक व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहे.
पूर्वी शिबला येथील आश्रमशाळेतील उत्तम शिक्षण, प्रशासन व शिस्तीमुळे अनेक पालकांची तेथे पाल्यांना प्रवेश देण्यासाठी गर्दी होत होती. मात्र गेल्या काही वर्षांत या आश्रमशाळेतील पटसंख्या सतत घसरत आहे. शिबला येथे निवासी आश्रमशाळा असतानाही काही शिक्षक व कर्मचारी आपल्या सोयीनुसार तालुक्याच्या ठिकाणावरून अप-डाऊन करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे दिसून येते. काही शिक्षक तर जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यामुळे ते अनेकदा शाळेवरही उशिरा पोहोचतात. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिबला परिसरात एखादे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दौरा असला, तरच शिक्षक रात्री आश्रमशाळेत उपस्थित राहतात. त्यांचा दौरा आटोपला की, पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते. मागीलवर्षी राज्यपाल आले असताना ही आश्रमशाळा चकाचक करण्यात आली होती. शिक्षक, विद्यार्थी त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मात्र आता पुन्हा विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच आपल्या घराकडे जाण्याची जादा ओढ असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांवर मुख्याध्यापक व शिक्षकांचा वचक नसल्यामुळे विद्यार्थी शिबला चौपाटीवर ‘टाईमपास’ करताना आढळतात. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी पालकांची मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The students of the ashram school are on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.