शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

एसटीच्या चाकाने दगड उडून अनेक प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 6:00 AM

जिल्हा मुख्यालयाचे बसस्थानक असल्याने येथे बसगाड्यांची सतत वर्दळ असते. एसटी बस बसस्थानकात शिरताना अथवा बाहेर पडताना टायरच्या खाली आलेला गोल दगड सुसाट वेगाने निसटून प्रवाशांचा वेध घेत आहे. कधी कोणत्या बसच्या टायरखालून दगड येऊन डोक्याला लागेल याचा नेम नाही. तात्पुरत्या बसस्थानकात मर्यादित जागा असल्याने प्रवाशांचे घोळके सर्वत्र असतात.

ठळक मुद्देप्रवाशांच्या जिविताला धोका : नव्या बसस्थानकात दगडांचा खच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालय परिसरात बसस्थानक उभारण्यात आले आहे. याठिकाणी व्यवस्था करताना प्रचंड घिसाडघाई केल्याचे दिसून येते. या परिसरात सर्वत्र टोळगोटे (गोलदगड) टाकलेले आहेत. या दगडांमुळे प्रवाशांचा कपाळमोक्ष होत आहे. अनेकजण जखमी झाले आहेत.जिल्हा मुख्यालयाचे बसस्थानक असल्याने येथे बसगाड्यांची सतत वर्दळ असते. एसटी बस बसस्थानकात शिरताना अथवा बाहेर पडताना टायरच्या खाली आलेला गोल दगड सुसाट वेगाने निसटून प्रवाशांचा वेध घेत आहे. कधी कोणत्या बसच्या टायरखालून दगड येऊन डोक्याला लागेल याचा नेम नाही. तात्पुरत्या बसस्थानकात मर्यादित जागा असल्याने प्रवाशांचे घोळके सर्वत्र असतात. त्यामुळे एसटी बसच्या टायरखालून सुटलेला दगड कुणाला ना कुणाला जखमी केल्याशिवाय राहात नाही. अशा जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पाच-सहा दिवसांपूर्वीच हे बसस्थानक वापरात घेतले आहे. मात्र याठिकाणी काम करताना नियोजनशून्यता असल्याचे दिसून येते. बसस्थानक परिसरात किमान दगडाची चुरी अंथरणे अपेक्षित होते. त्याऐवजी खदाणीतून निघालेला दगड याठिकाणी टाकण्यात आला. आता हाच दगड प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. या परिसरात पायदळ फिरताही येत नाही. शिवाय फलाटावर बसून एसटीची वाट पाहणेही सुरक्षित नाही. कधी कोण्या बाजूने दगड येईल याचा नेम नाही. प्रवासाला निघालेल्या अनेकांना कपाळमोक्ष झाल्याने घरी परत जावे लागले. एसटी महामंडळाने प्रवाशांच्या जीविताचा व सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.विभागीय कार्यालयांतर्गत असलेल्या बांधकाम विभागाकडे आतापर्यंत चार पत्र दिले आहेत. दगडांची समस्या गंभीर असून तातडीने उपाययोजनेची गरज आहे. यासाठी आगार प्रमुख म्हणून माझ्या स्तरावरून केवळ पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे. तो सातत्याने सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्यास येथे काम होऊ शकते.- रमेश उईके, यवतमाळ आगार प्रमुख

टॅग्स :state transportएसटी