शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेमंड व्यवस्थापनाने प्रस्ताव रद्द केल्याने संप चिघळणार; कामगार अधिकाऱ्यांनी दिली आंदोलनस्थळी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:13 IST

Yavatmal : वेतन करार २०२४ हा सात हजार २५० पेक्षा अधिक रकमेचा करावा, यासह इतर मागण्यांसाठी रेमंड कंपनीतील कामगारांनी १७ फेब्रवारी रोजी आझाद संपाचे हत्यार उगारले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वेतन करार २०२४ हा सात हजार २५० पेक्षा अधिक रकमेचा करावा, यासह इतर मागण्यांसाठी रेमंड कंपनीतील कामगारांनी १७ फेब्रवारी रोजी आझाद संपाचे हत्यार उगारले. मैदानातील आंदोलन स्थळी बुधवारी दुपारी कामगार अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चेसाठी गेले असता रेमंड व्यवस्थापनाने वेतनवाढीसंदर्भात दिलेला प्रस्ताव रद्द करीत असल्याचे पत्र दिले. त्यामुळे कामगारांना आता न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दुसरीकडे कामगारही संपावर ठाम असल्याने हा संप चिघळणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

येथील रेमंड युको डेनिम प्रा.लि.च्या कामगारांनी सोमवारी रात्रीपासून प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा संपाचे हत्यार उपसले. रात्रपाळीत कामासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना लोहारा चौकातच थांबविण्यात आले. दरम्यान, बुधवार १८ फेब्रुवारी रोजी कामगारांनी शहरातून मोर्चा काढून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच कामगार अधिकारी राहुल काळे, तहसीलदार योगेश देशमुख, तसेच इतर अधिकाऱ्यांनी आझाद मैदानात जाऊन कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर हे अधिकारी रेमंड व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेले असता रेमंड व्यवस्थापनाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वेतनवाढी संबंधी दिलेला प्रस्ताव रद्द केल्याचे सांगितले.

रेमंड व्यवस्थापनाचे काय आहे म्हणणे

सोमवार १६ फेब्रुवारीपासून कामगारांनी अवैधानिक संप सुरू केला आहे. व्यवस्थापनाने तोडगा काढण्याच्या उद्देशाने मान्यता प्राप्त संघटनेशी चर्चा करून एकूण पॅकेज, पॅकेजची विभागणी आणि वर्षानुसार टप्पे असलेला प्रस्ताव दिला होता. परंतु, कोणीही कामगार काल रात्री तृतीय पाळीत व बुधवार १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या व दुसऱ्या पाळीत उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनाने दिलेला प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. संपकर्त्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करणे अशक्य असल्याचे रेमंडचे कार्य निर्देशक नितीन श्रीवास्तव यांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

आझाद मैदानात कामगारांचे आंदोलन सुरू

येथील आझाद मैदानात कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी इतर कामगारही मैदानात आहेत. सुमारे १५०० कामगारांच्या वतीने विकास जोमदे यांनी यावेळी आपल्या विविध मागण्या कामगार अधिकाऱ्यांकडे सादर केल्या. मात्र, आता रेमंड व्यवस्थापनाने कामगारांना दिलेला प्रस्ताव रद्द केल्याने संपाचा तिढा आणखीनच किचकट झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Raymond Management Rejection Sparks Strike Escalation; Labor Officials Visit Protest

Web Summary : Raymond workers' strike intensifies after management retracts wage hike offer. Labor officials intervened, but the company deemed demands unfeasible due to the 'illegal' strike, potentially leading workers to seek legal recourse as the impasse continues at Azad Maidan.
टॅग्स :YavatmalयवतमाळRaymondरेमंड