रेमंड व्यवस्थापनाने प्रस्ताव रद्द केल्याने संप चिघळणार; कामगार अधिकाऱ्यांनी दिली आंदोलनस्थळी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:13 IST2026-02-19T15:11:08+5:302026-02-19T15:13:59+5:30

Yavatmal : वेतन करार २०२४ हा सात हजार २५० पेक्षा अधिक रकमेचा करावा, यासह इतर मागण्यांसाठी रेमंड कंपनीतील कामगारांनी १७ फेब्रवारी रोजी आझाद संपाचे हत्यार उगारले.

Strike will intensify as Raymond management cancels proposal; Labor officials visit protest site | रेमंड व्यवस्थापनाने प्रस्ताव रद्द केल्याने संप चिघळणार; कामगार अधिकाऱ्यांनी दिली आंदोलनस्थळी भेट

Strike will intensify as Raymond management cancels proposal; Labor officials visit protest site

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
वेतन करार २०२४ हा सात हजार २५० पेक्षा अधिक रकमेचा करावा, यासह इतर मागण्यांसाठी रेमंड कंपनीतील कामगारांनी १७ फेब्रवारी रोजी आझाद संपाचे हत्यार उगारले. मैदानातील आंदोलन स्थळी बुधवारी दुपारी कामगार अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चेसाठी गेले असता रेमंड व्यवस्थापनाने वेतनवाढीसंदर्भात दिलेला प्रस्ताव रद्द करीत असल्याचे पत्र दिले. त्यामुळे कामगारांना आता न्यायालयात धाव घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. दुसरीकडे कामगारही संपावर ठाम असल्याने हा संप चिघळणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

येथील रेमंड युको डेनिम प्रा.लि.च्या कामगारांनी सोमवारी रात्रीपासून प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा संपाचे हत्यार उपसले. रात्रपाळीत कामासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांना लोहारा चौकातच थांबविण्यात आले. दरम्यान, बुधवार १८ फेब्रुवारी रोजी कामगारांनी शहरातून मोर्चा काढून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. याची माहिती मिळताच कामगार अधिकारी राहुल काळे, तहसीलदार योगेश देशमुख, तसेच इतर अधिकाऱ्यांनी आझाद मैदानात जाऊन कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर हे अधिकारी रेमंड व्यवस्थापनासोबत चर्चा करण्यासाठी गेले असता रेमंड व्यवस्थापनाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी वेतनवाढी संबंधी दिलेला प्रस्ताव रद्द केल्याचे सांगितले.

रेमंड व्यवस्थापनाचे काय आहे म्हणणे

सोमवार १६ फेब्रुवारीपासून कामगारांनी अवैधानिक संप सुरू केला आहे. व्यवस्थापनाने तोडगा काढण्याच्या उद्देशाने मान्यता प्राप्त संघटनेशी चर्चा करून एकूण पॅकेज, पॅकेजची विभागणी आणि वर्षानुसार टप्पे असलेला प्रस्ताव दिला होता. परंतु, कोणीही कामगार काल रात्री तृतीय पाळीत व बुधवार १८ फेब्रुवारी रोजी पहिल्या व दुसऱ्या पाळीत उपस्थित झाले नाहीत. त्यामुळे व्यवस्थापनाने दिलेला प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. संपकर्त्यांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करणे अशक्य असल्याचे रेमंडचे कार्य निर्देशक नितीन श्रीवास्तव यांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

आझाद मैदानात कामगारांचे आंदोलन सुरू

येथील आझाद मैदानात कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या कामगारांना पाठिंबा देण्यासाठी इतर कामगारही मैदानात आहेत. सुमारे १५०० कामगारांच्या वतीने विकास जोमदे यांनी यावेळी आपल्या विविध मागण्या कामगार अधिकाऱ्यांकडे सादर केल्या. मात्र, आता रेमंड व्यवस्थापनाने कामगारांना दिलेला प्रस्ताव रद्द केल्याने संपाचा तिढा आणखीनच किचकट झाला आहे.

Web Title : रेमंड प्रबंधन द्वारा प्रस्ताव रद्द करने से हड़ताल बढ़ी; श्रम अधिकारियों ने किया विरोध स्थल का दौरा

Web Summary : रेमंड के कर्मचारियों की हड़ताल प्रबंधन द्वारा वेतन वृद्धि की पेशकश वापस लेने के बाद तेज हो गई। श्रम अधिकारियों ने हस्तक्षेप किया, लेकिन कंपनी ने 'अवैध' हड़ताल के कारण मांगों को अव्यावहारिक माना, जिससे श्रमिकों को कानूनी सहारा लेने के लिए मजबूर होना पड़ सकता है क्योंकि आज़ाद मैदान में गतिरोध जारी है।

Web Title : Raymond Management Rejection Sparks Strike Escalation; Labor Officials Visit Protest

Web Summary : Raymond workers' strike intensifies after management retracts wage hike offer. Labor officials intervened, but the company deemed demands unfeasible due to the 'illegal' strike, potentially leading workers to seek legal recourse as the impasse continues at Azad Maidan.