पाथरीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By Admin | Updated: November 5, 2016 00:20 IST2016-11-05T00:20:03+5:302016-11-05T00:20:03+5:30
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने वैतागलेल्या पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्यांनी

पाथरीत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
वीज वितरणवर रोष : यवतमाळ-पांढरकवडा मार्ग एक तास ठप्प
रुंझा : वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने वैतागलेल्या पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्यांनी यवतमाळ-पांढरकवडा मार्गावर शुक्रवारी रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनाने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.
पांढरकवडा तालुक्यात विजेचा अनियमित पुरवठा होतो. सध्या रबी हंगामासाठी ओलिताची आवश्यकता आहे. १२ तास वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिल्यानंतरही सुरळीत वीज मिळत नाही. त्यामुळे शेतातील पिके नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार निवेदन देवूनही दखल घेत नसल्याने शुक्रवारी सकाळी ९ वाजता पाथरीच्या बसस्थानकासमोर ठिय्या दिला. तब्बल तासभर रस्ता रोको करण्यात आला. आंदोलनाची माहिती होताच वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता जे.एस. गोलाईत तेथे उपस्थित झाले. पांढरकवडाचे पोलीस उपनिरीक्षक संजय माने यांनीही बंदोबस्त लावला. समस्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनाचे नेतृत्व देवराव राठोड, रघुनाथ आडे, उत्तम राठोड, योगेश राठोड आदी शेतकऱ्यांनी केले. (वार्ताहर)