शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांची निदर्शने

By admin | Updated: May 28, 2014 00:00 IST

प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळ प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आगार आणि कार्यशाळेतील कामगारांनी निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच वाढीव

प्रश्न प्रलंबित : सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे वाढीव महागाई भत्त्याची मागणी

यवतमाळ : प्रलंबित प्रश्नांकडे एसटी महामंडळ प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आगार आणि कार्यशाळेतील कामगारांनी निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच वाढीव दहा टक्के महागाई भत्ता कामगार करारानुसार लागू करून थकबाकीसह मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

कामगार करार २0१२-१६ होवून एक वर्षाचा कालावधी लोटला. मात्र कामगारांना अजूनही ५५0 कोटींची थकबाकी देण्यात आली नाही. शासनाकडून महामंडळाला घेणे असलेले एक हजार ८४0 कोटी मिळावे, इतर राज्याप्रमाणे प्रवासीकरात सूट द्यावी, पथकरातून सूट मिळावी, बंधनकारक परंतु फायद्याच्या नसलेल्या मार्गावरील बससेवेमुळे महामंडळाच्या होणार्‍या आर्थिक तोट्याची भरपाई शासनाने करून तशी तरतूद बजेटमध्ये करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

करार कायदे, परिपत्रकाचा होणारा भंग करून घेतलेले निर्णय रद्द करावे, न्यायालयाच्या आदेशानुसार अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, उत्पन्न वाढविण्यासाठी संघटनेने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी आदी मागण्या करून निदर्शने करण्यात आली. याची दखल न घेतल्यास ४ जूनला आझाद मैदान मुंबई येथे धरणे आणि यानंतरही प्रश्न निकाली न निघाल्यास राज्यव्यापी चक्काजामचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ कार्यशाळेसमोर या आंदोलनाचे नेतृत्त्व महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सदाशिव शिवनकर यांनी केले. आंदोलनात विजय मुळे, प्रवीण बोनगीरवार, खेमराज जावडेकर, मो. इस्तीयाक, विलास डगवार, शंकर ठाकरे, प्रताप तरवरे, सै. इरफान, राहुल धार्मीक, लक्ष्मण गारशेलवार, उत्तम पाटील, रमेश पेटे, प्रकाश उईके आदी सहभागी झाले होते.

नेर येथे सुद्धा धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष एन. खान, नितीन चव्हाण, सलीम भाई, संजय ठाकरे, दिलीप नाईकर, संदीप मुने, रामदास बेले, अनिल गोंडाणे, राजेश कारमोरे, उमेश लोहकरे, मोहंमद नवादिन, राहुल बिजवे आदींसह शेकडो चालक, वाहक, कामगार उपस्थित होते. (वार्ताहर)