शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ने मागितला रोजंदारांच्या पगाराचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

महामंडळात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केलेल्या कामगिरी एवढाच पगार दिला जातो. मार्च महिन्यात काही कर्मचाऱ्यांची आठ ते १५ दिवस एवढीच ड्यूटी झाली. याच महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला. एसटी बसेस थांबल्या. नियमित कर्मचाऱ्याना पूर्ण दिवसांचा पगार देण्यात आला. रोजंदारी कर्मचाऱ्यांना झालेल्या ड्यूटी इतकाच पगार मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊन काळात आवक थांबल्याने एसटी महामंडळाने पै-पैचा हिशेब घेणे सुरू केले आहे. आता रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या पगाराचा हिशेब विभाग नियंत्रकांना मागितला आहे. काही विभागांमध्ये या कर्मचाऱ्यांना केलेल्या कामाइतकाच पगार दिला, तर काही ठिकाणी मात्र संपूर्ण महिन्याचा पगार देण्यात आला. आता घेतला जात असलेला हिशेब कोणावर शेकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महामंडळात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केलेल्या कामगिरी एवढाच पगार दिला जातो. मार्च महिन्यात काही कर्मचाऱ्यांची आठ ते १५ दिवस एवढीच ड्यूटी झाली. याच महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला. एसटी बसेस थांबल्या. नियमित कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवसांचा पगार देण्यात आला. रोजंदारी कर्मचाºयांना झालेल्या ड्यूटी इतकाच पगार मिळाला.बसफेऱ्या बंद असल्या तरी नियमित कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात आले. रोजंदारी कर्मचाऱ्यांना मात्र काही विभागातच पूर्ण महिन्याचे वेतन दिले. हीच बाब महामंडळाने हेरून रोजंदारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनाचा हिशेब मागितला आहे. लॉकडाऊन कालावधीत त्यांच्या प्रत्यक्ष हजर दिवसांऐवजी संपूर्ण कालावधीचे वेतन अदा करण्यात आलेले निदर्शनास आले आहे, असे नमूद करून हा हिशेब मागविला गेला आहे. काही विभागांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले नाही. याविषयी काही कामगार संघटनांनी आवाज उठविला होता. यवतमाळ विभागाने वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितले होते. अद्याप तरी या विभागाने रोजंदारी कर्मचाऱ्यांना न केलेल्या कामाचा पगार दिलेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा होता की द्यायचा नव्हता या प्रश्नाने गोंधळ घालणे सुरू केले आहे.पूर्ण वेतन करण्याचाच आदेश होता - अरुण गाडगेएसटीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन करण्याचाच आदेश होता. या आधारेच सदर कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले आहे, असा दावा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव अरुण गाडगे यांनी केला आहे. महामंडळाच्या पत्राला अनुसरूनच पूर्ण वेतनाची मागणी सेनेने लावून धरली होती, असेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :state transportएसटी