शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तीन आठवड्यांपासून एसटी बस जागेवरच; बॅटरी जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटरी वाचेल आणि कुठला बिघाडही हाेणार नाही. यादृष्टीने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. मात्र, कर्मचारीच संपावर असल्याने एसटीची सुस्थिती कायम ठेवण्याचे आवाहन परिवहन महामंडळापुढे उभे आहे.

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २६ दिवसांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपामुळेएसटीची चाके रूतली आहे. कुठलेही यंत्र सतत बंद राहिले तर त्याच्यावर परिणाम होतो. हा नियम आहे. या नियमानुसार एसटीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने बॅटरी जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही यांत्रिक प्रश्नही उद्भवू शकतात. यावर मात करण्यासाठी कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे दररोज एसटी अर्धा तास सुरू करण्याच्या सूचना आहेत. याशिवाय बॅटरीचे केबल काढून ठेवण्याचेही आदेश आहेत. यामुळे बॅटरी वाचेल आणि कुठला बिघाडही हाेणार नाही. यादृष्टीने कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. मात्र, कर्मचारीच संपावर असल्याने एसटीची सुस्थिती कायम ठेवण्याचे आवाहन परिवहन महामंडळापुढे उभे आहे. या संपाने मेंटेनन्सचा खर्च वाढू शकतो. यातून विविध अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

बसेसच्या झाल्या  केवळ सहा फेऱ्या- जिल्ह्यातील यवतमाळ आगारातून चार बसफेऱ्या निघाल्या, तर वणी आगारातून दोन बस बाहेर पडल्या.- आंदोलकांची वाढती दहशत पाहता कर्मचाऱ्यांनी वाहने रस्त्यावर काढण्यास आखडता हात घेतला.- दोन दिवसात परिवहन महामंडळाला केवळ नऊ हजार रुपये हातात पडले आहे.

आतापर्यंत २९१ जणांवर झाली कारवाई- राज्य परिवहन महामंडळाने २९१ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. ही कारवाई निरंतर सुरू आहे.- परिवहन महामंडळाने १०४ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे आदेश काढले आहेत.- एकीकडे आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे कारवाईचा बडगा सुरू आहे.

 केवळ १६० कर्मचारी कामावर

- जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये, आस्थापनांमध्ये काम करणारे १६० कर्मचारी कामावर आले आहेत.- यामध्ये चालक, वाहकांची संख्या फारच कमी आहे. यामुळे वाहनांना चालू-बंद करताना विविध अडचणी येत आहेत.

मेंटेनन्सवर होणार लाखोंचा खर्च

- लाॅकडाऊन काळात परिवहन महामंडळाने ज्या पद्धतीने एसटी बसची काळजी घेतली त्याचप्रमाणे संपकाळातही ही खबरदारी घेण्याच्या सूचना आहे.

- बॅटरी चालू-बंद करणे, बॅटरीचा करंट काढून ठेवणे, अशा प्रकारची कामे मर्यादित कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर पार पाडली जात आहेत.

 

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप