महागावजवळ ट्रकची एसटी बसला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:00 AM2020-11-30T05:00:00+5:302020-11-30T05:00:36+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गवरील महागावजवळ भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिली. या अपघातात सहा ...

ST bus hit by truck near Mahagaon | महागावजवळ ट्रकची एसटी बसला धडक

महागावजवळ ट्रकची एसटी बसला धडक

googlenewsNext
ठळक मुद्देनांदगव्हाण घाटात ट्रक उलटून चालक ठार

  लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गवरील महागावजवळ भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली. 
या अपघातात जयश्री किसन घुसे, देवीदास सावंत, गंगुबाई दिलीप कदम, आकाश चोपडे आणि दत्तराव हातमोडे हे प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. नांदेड येथून ट्रक (एम.एच.२७/ए-४५७७) अमरावतीकडे जात होता. त्याचवेळी माहूर आगाराची बस (एम.एच.१४/बीटी-२००१) माहूर येथून नांदेडकडे जात होती. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास या दोनही वाहनांचा येथील एका पेट्रोलपंपाजवळ अपघात झाला. दोनही वाहने समोरासमोर एकमेकांवर आदळल्याने बसमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक नारायण श्यामराव वड्डे होते. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्तलिहिस्तोवर ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता.

नांदगव्हाण घाटात  ट्रक उलटून चालक ठार
महागाव ते उमरखेड मार्गावरील नांदगव्हाण घाटात सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक दरीत उलटला. या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. संभाजी असीने (५०) रा.नांदेड असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. ते ट्रकमध्ये (एम.एच.२६/एडी-००६९) साेयाबीन घेऊन नांदेड येथून नागपूरकडे जात होते. नांदगव्हाण घाटातील वळणावर ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक २० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला.

Web Title: ST bus hit by truck near Mahagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात