शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

गुन्हे उघड आणण्याच्या गतीवर ‘एसपी’च नाखूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे घटते प्रमाण याबाबत एसपींनी तीव्र चिंता व्यक्त केली. गुन्हा घडणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे, त्यासाठी रात्रगस्त, सतर्कता, गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.

ठळक मुद्देडिटेक्शन वाढवा : ३१ डिसेंबरपूर्वी टार्गेटपूर्तीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मालमत्तेचे गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्या तुलनेत हे गुन्हे उघडकीस येण्याचे (डिटेक्शन) प्रमाण कमी आहे. डिटेक्शनच्या या गतीवर खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हेसुद्धा समाधानी नाहीत. त्यामुळेच सोमवारी झालेल्या क्राईम मिटींगमध्ये त्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हाभरातील ठाणेदारांना दिले.पोलीस मुख्यालयात ठाणेदारांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सर्व ठाणेदारांना ३१ डिसेंबर या टार्गेटपूर्तीच्या डेडलाईनचे स्मरण करून दिले. मटका, जुगार, दारू, अंमली पदार्थांची तस्करी, प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा, जनावरांची तस्करी, प्रतिबंधात्मक कारवाई, वाहन चालान करणे अशा वेगवेगळ्या मुद्यावर वार्षिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले होते. या उद्दीष्टपूर्तीसाठी अवघे तीन आठवडे शिल्लक असल्याने वेगाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उद्दीष्टपूर्तीत जिल्हा कुठेही मागे राहू नये, कामगिरी सरस ठरावी अशी अपेक्षा एसपींनी व्यक्त केली.जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे घटते प्रमाण याबाबत एसपींनी तीव्र चिंता व्यक्त केली. गुन्हा घडणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे, त्यासाठी रात्रगस्त, सतर्कता, गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. एवढे करूनही गुन्हा घडला तर तो तातडीने कसा उघडकीस आणता येईल, त्यातील आरोपींना कशी लवकर अटक करता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हिस्ट्रीशिटर, क्रियाशील गुन्हेगार यांची नियमित चेकींग करावी, दंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तडीपारीच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करावा, सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे, पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना सभ्यतेची वागणूक द्यावी, न्यायालयात दाखल होणाºया खटल्यांमध्ये आरोपींना अधिकाधिक शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करावे, सरकारी पंच-साक्षीदारांना न्यायालयात उपस्थित ठेवावे, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या.क्राईम मिटींगवर अधिवेशनाचे सावटविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाची हूरहूर क्राईम मिटींगमध्ये पहायला मिळाली. अधिवेशन काळात जिल्ह्यात कोणतेही वादग्रस्त प्रकरण उपस्थित राहणार नाही, गंभीर गुन्हा घडणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या आणि आणखी खबरदारी घेण्याच्या सूचना ठाणेदारांना देण्यात आल्या.‘सीसीटीएनएस’च्या पोलिसांचा सत्कार‘सीसीटीएनएस’ (क्राईम अ‍ॅन्ड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्क अ‍ॅन्ड सिस्टीम) प्रणालीमध्ये जिल्हा पोलीस दलाने २०१७ पाठोपाठ २०१९ या वर्षातसुद्धा राज्यातून पहिला क्रमांक मिळविला. या यशात वाटेकरी असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील संबंधित दोन कर्मचाºयांना सोमवारी क्राईम मिटिंगमध्ये प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व अन्य अधिकाºयांनी या पोलिसांसोबत स्नेहभोजन घेतले.

टॅग्स :Policeपोलिस