शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रारींचा खच : अनेकांवर दुबार पेरणीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. पेरलेले कंपनीचे बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही, अशा तक्रारी येत आहे. यामुळे कृषी विभाग हादरला आहे. शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.गतवर्षी सोयाबीन काढणीच्या वेळेस परतीचा पाऊस आला. यामुळे बिजोत्पादन क्षेत्रातील सोयाबीन बिजाला फटका बसला. यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला. अचानक बाजारात सोयाबीन बियाण्याची गर्दी वाढली. आता हे सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी वाढत आहेत.पेरणीनंतर पाऊस बरसला. मात्र शेतकºयांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही. यात नामांकित कंपन्यांसोबत काही नवख्या कंपन्यांचा समावेश आहे. यवतमाळ, दारव्हा, उमरखेड, पुसद, वणी आणि झरीजामणीसह इतरही तालुक्यातून बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामुळे या क्षेत्रावर आता दुबार पेरणी करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.बाजारात विक्रीस आलेले सोयाबीन काही कंपन्यांनी बॅगमध्ये भरूनच विकले तर नाही ना, असा संशय शेतकरी उपस्थित करत आहे. काही बियाण्याच्या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात कचराही आढळला. बाजारातील टंचाई लक्षात घेता शेतकºयांच्या माथी, असे बियाणे मारले तर गेले नाही ना, अशी ओरड होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या पेरण्या उलटत आहे. शेतकºयांनी जिल्हा कृषी अधीक्षकांसह कृषी विकास अधिकाºयांकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. तालुका कृषी अधिकाºयांकडेही तक्रारी आल्या आहेत.घरचे बियाणे उगवलेकंपनीच्या बियाण्यावर पूर्ण भरवसा असल्याने शेतकरी दामदुप्पट भावात बियाणे खरेदी करतात. तर काही शेतकºयांनी घरचे बियाणे आणि विकतचे बियाणे शेतात पेरले. विकतचे बियाणे बाद झाले. मात्र घरचे बियाणे निघाले. एकाच दिवशी एकाच शेतात पेरणी केल्यावर हा प्रकार शेतकºयांच्या निदर्शनास आला. चिकणीचे शेतकरी अविनाश राऊत यांनी या प्रकारावर तीव्र संताप नोंदविलाशनिवारपासून करणार पंचनामेप्रत्येक तालुक्यात बोगस बियाण्याच्या तक्रारी येत आहे. त्यांची दखल घेत शनिवारपासून कृषी विभाग पंचनामे करणार आहे. शुक्रवारी खानगावचे शेतकरी प्रमोदचंद मुराब, धानोºयाचे शेतकरी रवींद्र यादव, शैलेश यादव, राजेश यादव यांनी तक्रारी नोंदविल्या. याशिवाय यवतमाळ तालुक्यातील कामठवाडा शिवारातूनही काही तक्रारी आल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती