लोकमत न्यूज नेटवर्कपुसद (यवतमाळ) : युवकाने स्वतःच्या मृत्यूची इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुसद तालुक्यात हुडी (बुद्रुक) येथे सोमवारी, २९ डिसेंबर रोजी दुपारी एक ते दीड वाजताचे दरम्यान घडली. आत्महत्येपूर्वी युवकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा फोटो लावून त्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आणि मृत्यूची वेळही लिहिली होती. शिवराज रामराव दोडके (वय १८)) असे मृताचे नाव आहे.
आत्महत्येची घटना लक्षात येताच आजीने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. पोलिस पाटील दिनेश हरणे यांनी माहिती पुसद ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुसद शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शिवराजचे आई-वडील पुणे येथे कामासाठी गेले असून, तो आजीबरोबर राहात होता. त्याने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी ठेवली. इन्स्टाग्राम आयडीवर ठेवण्यात आलेली पोस्ट पाहिल्यानंतर ही आत्महत्या पोस्ट अपलोडनंतर केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.
हीच ती पोस्ट
'सॉरी फॅमिली, मी तुमचा आधार नाही बनू शकलो, मिस यू किंग. शिवराज दोडके याचे आज दुपारी १ वाजता निधन झाले आहे. तर अंत्यविधी उद्या सकाळी १२ वाजून ३५ मिनिटाला आहे. मुक्काम पोस्ट हुडी (बु.) तालुका पुसद, भावपूर्ण श्रद्धांजली शिवराज दोडके' अशा प्रकारची पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर ठेवली होती.
Web Summary : A young man in Pusad, Yavatmal, tragically ended his life by hanging himself after posting a suicide note on Instagram. The post expressed his sorrow for failing his family. Police are investigating the incident, which occurred on Monday afternoon. He lived with his grandmother while his parents worked in Pune.
Web Summary : पुसद, यवतमाल में एक युवक ने इंस्टाग्राम पर सुसाइड नोट पोस्ट करने के बाद फांसी लगाकर आत्महत्या कर ली। पोस्ट में परिवार को विफल करने का दुख व्यक्त किया गया था। पुलिस मामले की जांच कर रही है। घटना सोमवार दोपहर की है। वह अपनी दादी के साथ रहता था जबकि उसके माता-पिता पुणे में काम करते थे।