कधी पैशांचा पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी गंडेदोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 05:00 IST2021-08-25T05:00:00+5:302021-08-25T05:00:20+5:30
अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार केला. यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. हा कायदा अस्तित्वात येत असताना घाटंजी तालुक्यात नरबळी दिला होता.

कधी पैशांचा पाऊस, तर कधी पुत्रप्राप्तीसाठी गंडेदोरे
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अंधश्रद्धा ही ग्रामीण भागासोबतच शहरातही मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. उच्चशिक्षितांमध्येही अंधश्रद्धेची पाळेमुळे पाहायला मिळतात. फक्त त्याचा प्रकार बदलला असतो. कठोर कायदा होऊनही अंधश्रद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कागदोपत्री असून, त्याचा प्रभावीपणे अंमल करण्यासाठी पोलीस यंत्रणा पुढे येताना दिसत नाही. जाणीवपूर्वक अशा प्रकरणांमध्ये पोलिसांकडून हात झटकले जातात.
आठ वर्षांत, ३२ गुन्हे दाखल
- पोफाळी येथे करणीच्या संशयातून पुतण्या व दिराने अंगणवाडीसेविकेचा निर्घृण खून केला होता.
- घाटंजी तालुक्यात सपना पळसकर या चिमुकलीचा नरबळी देऊन तिचे रक्त प्राशन केले होते.
२०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा
अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर, तसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार केला. यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. हा कायदा अस्तित्वात येत असताना घाटंजी तालुक्यात नरबळी दिला होता.
प्रत्येक पिढीलाच द्यावे लागणार योगदान
अंधश्रद्धा ही समाजातून हद्दपार होणे शक्य नाही. तिचे स्वरूप बदलत जाते. त्यामुळे प्रत्येक पिढीलाच अंधश्रद्धेविरोधात जनजागृती माेहीम हाती घेऊन काम करणे आवश्यक आहे.
- शशिकांत फेंडर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सचिव
भानामती कसली, हे तर खेळ विज्ञानाचे
जादूटोणा, भानामती ही प्रत्यक्षात नाही, ते विज्ञानाचे खेळ आहेत. लिंबू चाकूने कापताना त्यातून रक्त येते, असा देखावा तयार केला जातो. प्रत्यक्ष चाकूला मिथेल ऑरेंज लावलेले असते.
यज्ञात पाणी शिंपडताच, तो प्रज्वलित होतो
यज्ञात पोटॅशिअम पॅरामॅगनेट टाकून ठेवलेले असते. नंतर त्यावर ग्लिसरिन शिंपडले जाते. थर्मोडायनामिक प्रक्रियेने यज्ञ पेट घेतो.