शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणची चौकशी

By admin | Updated: July 30, 2014 00:02 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनागोंदी अनेक वर्षांपासून कायम आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी येथून विविध योजना राबविल्या जातात. साहित्याचे वाटप केले जाते.

जिल्हा परिषद : लाभार्थी निवडण्यापूर्वी खरेदी, वाटपच नाहीयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनागोंदी अनेक वर्षांपासून कायम आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी येथून विविध योजना राबविल्या जातात. साहित्याचे वाटप केले जाते. यात अनियमितता असल्याने हे साहित्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी समाजकल्याण विभागाची चौकशी सुरू केली आहे. राळेगाव पंचायत समितीचे सभापती अशोक केवटे यांनी सर्वसाधारण सभेत समाजकल्याणचे साहित्य गोदामातच कुजल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे साहित्य का वाटण्यात आले नाही, याची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर सीईओंनी तातडीने मुख्य लेखाधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समाजकल्याणच्या साहित्य खरेदी व वाटपाच्या प्रक्रियेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे येथील समाजकल्याण अधिकाऱ्याला सीईओंनी शोकॉज बजावल्यानंतर त्यांनी आचारसंहितेची सबब पुढे करून साहित्य खरेदी व वाटप रखडल्याचे सांगितले. समाजकल्याण विभागात मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे. २००९-१० मध्ये लाभार्थी न ठरविताच थेट साहित्याची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर वाटपासाठी लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण झालीच नाही. साहित्य अजूनही पंचायत समितीस्तरावर गोदामांमध्ये कुजत आहे. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती केली जात आहे. जिल्हा परिषदेचा सेस फंड आणि १३ वनेमधून मिळणारा निधी यातून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. प्रत्यक्षात मात्र अजूनही साहित्य खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आर्थिक वर्षे संपले तरी या विभागाचा निधी अखर्चित आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या अल्पभूधारक व भूमिहिन घटकांसाठी या योजना आहेत. अधिकाऱ्याचा हेतू प्रामाणिक नसल्याने लाभार्थ्यांची परवड होत आहे. आता सीईओंकडून केल्या जात असलेल्या चौकशीमध्ये काय बाहेर येते आणि त्यावरून कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी नवलकिशोर राम यांनीसुद्धा समाजकल्याण विभागाची चौकशी सुरू केली होती. मात्र त्यावेळी संबंधित विभागाकडून कोणतेच सहकार्य मिळाले नाही. प्रकरण अंगावर शेकणार, हे लक्षात येताच कॉंग्रेस धार्जिण्या तत्कालीन अधिकाऱ्याने आपली बदली करून घेतली. आता ही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. इकडे चौकशी लागण्यापूर्वीच समाजकल्याण अधिकारी विजय साळवे यांची बदली झाली आहे. या दोन्ही घटनेत साम्य म्हणजे स्थानिक कॉंग्रेसच्या नेत्यांचेच अभय मिळाले आहे. अशा स्थितीत अपहार व अनियमितता सिद्ध झाल्यास बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल काय, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)