यवतमाळ जिल्ह्यात सहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 23:02 IST2020-10-18T23:01:34+5:302020-10-18T23:02:57+5:30
suicide Yavatmal News सहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सवना येथे रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

यवतमाळ जिल्ह्यात सहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सहाव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सवना येथे रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अभिनंदन ज्ञानेश्वर गावंडे (१२ वर्ष) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सवना येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता. घरालगत असलेल्या शेवग्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या माहिलेस त्याचा झाडाला लटकलेला मृतदेह आढळला. मृतकाचे काका नारायण दिगंबर गावंडे यांनी या घटनेची फिर्याद महागाव पोलिसांना दिली. खेळण्याच्या वयात विद्यार्थ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. महागाव तालुक्यात आठवड्याभरात लागोपाठ चार आत्महत्या घडल्या आहेत.