शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पशुधनात होतेय लक्षणीय घट

By admin | Updated: October 21, 2014 23:00 IST

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे़ जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या

वणी : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे़ जनावरांच्या चारा-पाण्याची भेडसावणारी समस्या जनावरांच्या घटीला कारणीभूत ठरत आहे़ यामुळे शेतकरी, शेतमजुरांनी जनावरे मिळेल त्या भावात विक्रीचा सपाटा सुरू केल्याने गावरानी जनावरे कमी होत आहे.आपला भारत देश कृषिप्रधान आहे़ त्यामुळेच देशातील ९० टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे़ पूर्वी शेतीच्या मशागतीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे़ परिणामी शेतकऱ्यांचा जिवा-भावाचा सखा म्हणून बैलांची ओळख होती़ या बैलांना जन्म देणारी गाय ‘गोमाता’ म्हणून ओळखली जाते़ आता आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यांत्रिक शेतीकडे शेतकरी वळत आहेत़ सोबतच आता औताच्या सहाय्याने शेती करण्यासाठी ‘सालगडी‘ मिळणे दुरापास्त झाले आहे़ सालगड्यांचे वार्षिक वेतन दीड ते दोन लाखांवर पोहोचले आहे. परिणामी औताने शेती करणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. त्यामुळे बैलांची संख्या दिवसेंविदस कमी होत आहे.पूर्वी शेतकऱ्यांची ओळखही किती ‘औताचा‘ शेतकरी म्हणून होत होती. ज्या शेतकऱ्याजवळ जितके जास्त औत, तितका त्या शेतकऱ्यांचा दर्जा मोठा होता. तेच औत ओढण्यासाठी त्यांना बैलांची गरज होती. त्यामुळे पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलांची ‘दावण‘ दिसणे, हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. तथापि आता बैलांच्या जोड्या निर्माण करणाऱ्या गोमाताच नष्ट होत आहे़विदर्भातील गावरानी बैल कष्टाळू बैल म्हणून ओळखले जातात. त्यांना पूर्वी अधिक मागणी होती. शेतकरी कधी काळी बैल व पाळीव जनावरांसाठी शेतात कुरण राखून ठेवायचे़ आता कुरणेही नष्ट होत आहेत. पूर्वी शेतकरी म्हटला की, त्यांच्याकडे गायी, म्हशी पाळल्या जात होत्या. या जनावरांपासून मिळणारे दूध, दही, लोणी, तूप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते. एवढेच नव्हे तर सालदारांनाही त्याचे वाटप केले जात होते. त्यामुळे ग्रामीण भागात दूध-दुभते राहात होते.यापूर्वी शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण भागातील शेतमजूर एखादी म्हैस किंवा गाय नाही, तर किमान एखादी बकरी तरी पाळत होते. त्यामुळे पूर्वी ग्रामीण भागात दुभाची धवलक्रांती होती़ लग्नकार्यप्रसंगी लागणारे दूध, दही गावातच मिळत होते. सोबतच या पाळीव जनावरांच्या विष्ठेपासून उत्तम प्रकारचे शेणखत तयार होत होते. परिणामी शेतीचा ‘पोत’ही सुधारत होता. रासायनिक खताची गरजही पडत नव्हती़ प्रत्येक गावात दोन-चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता जंगले नष्ट होऊ लागल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्यात नदी, नाले आटत असल्याने जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठी पाणीही मिळत नाही़ उन्हाळाभर म्हशींचे कळप नदी नाल्यात बसून दिसायचे, तेही दिसेनासे झाले आहे़ चारा-पाण्याच्या टंचाईमुळे शेतकरी, मजुरांनी गेल्या १० वर्षांत पाळीवर जनावरे विकण्याचा सपाटाच सुरू केला. विक्रीस काढलेली जनावरे घेण्यास पुन्हा दुसरे शेतकरी व शेतमजूर उत्सुक नसतात. त्यामुळे आता दुधाळ व धष्टपुष्ट जनावरेसुध्दा दुसऱ्यालाच विकावी लागतात. परिणामी कत्तलखाने आता भाकड जनावरांनी न भरता दुधाळ व धष्टपुष्ट जनावरांनी भरलेले दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागात दुधाचे वाहणारे पाट बंद झाले़ पिशवीचे दूध विकत घेण्याची वेळ खुद्द शेतकऱ्यांवरच ओढवली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)