धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून मुलानेच केली वडिलांची हत्या

By विलास गावंडे | Updated: October 15, 2022 22:21 IST2022-10-15T22:20:47+5:302022-10-15T22:21:11+5:30

विजय नीळकंठ गेडाम (५०) असे मृताचे नाव आहे. मुलगा मयूर विजय गेडाम (२१) याने त्यांना ठार मारले

Shocking! The son killed his father by throwing a stone on his head | धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून मुलानेच केली वडिलांची हत्या

धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून मुलानेच केली वडिलांची हत्या

वडकी (यवतमाळ) : डोक्यात दगड टाकून मुलाने वडिलांना ठार मारल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सावित्री (ता.राळेगाव) येथे घडली. याप्रकरणी मुलास ताब्यात घेण्यात आले आहे.

विजय नीळकंठ गेडाम (५०) असे मृताचे नाव आहे. मुलगा मयूर विजय गेडाम (२१) याने त्यांना ठार मारले. स्वत:च्या राहत्या घरीच मयूरने वडिलांच्या डोक्यात दगड घातले. यामागील कारण मात्र कळू शकले नाही. घटनेनंतर आरोपी मयूर पसार झाला. त्याला खैरी येथून ताब्यात घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर पोलीस कारवाई सुरू होती.

Web Title: Shocking! The son killed his father by throwing a stone on his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.