धक्कादायक! आठवीत गेलेल्या १४ वर्षाच्या बालकाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2023 20:56 IST2023-06-24T20:56:30+5:302023-06-24T20:56:56+5:30

Yawatmal News १४ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी २४ जून रोजी सुकळी (न.) येथे घडली. वैभव विजय जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. 

Shocking! A 14-year-old boy who passed away committed suicide by hanging himself | धक्कादायक! आठवीत गेलेल्या १४ वर्षाच्या बालकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! आठवीत गेलेल्या १४ वर्षाच्या बालकाची गळफास घेऊन आत्महत्या


यवतमाळ : १४ वर्षाच्या बालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी २४ जून रोजी सुकळी (न.) येथे घडली. वैभव विजय जाधव असे मृत बालकाचे नाव आहे. 


वैभव नुकताच श्री शिवाजी विद्यालयात सातवा वर्ग पास झाला. कुटुंबात आई-वडील, लहान भाऊ, बहीण आहे. आईवडील मजुरी करतात. वैभव शुक्रवारी संध्याकाळी घराजवळ बांधलेली म्हैस आणण्यासाठी बाहेर गेला. मात्र परत आलाच नाही. कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने रात्रभर शोध घेतला. शनिवारी गावाजवळील विद्युत सबस्टेशनजवळ नाल्यालगत निंबाच्या झाडाला वैभव दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या घटनेची माहिती पोलीस पाटील वाघाजी जाधव यांनी पोफाळी पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी वैभवच्या आईवडील आणि शेजाऱ्यांना घटनेबाबत विचारणा केली. मात्र आत्महत्येचे कारण कोणीच सांगू शकले नाही. मोठा मुलगा असल्यामुळे जाधव दाम्पत्य वैभववर खूप प्रेम करीत होते. तो घरी सामान्य होता. त्याने आत्महत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोफाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास ठाणेदार राजीव हाके यांच्या मार्गदर्शनात राजेश पंडित, देवीदास आठवले, संदीप शेरे करीत आहेत.

Web Title: Shocking! A 14-year-old boy who passed away committed suicide by hanging himself

टॅग्स :Deathमृत्यू