शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

१७ हजार एसटी बसेसची शाम्पू, सोड्याने धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 2:50 AM

कोविड पळवायचा : महामंडळ पुसून टाकणार अस्वच्छतेचा कलंक

विलास गावंडेयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या दैवताच्या आरोग्यासाठी सखोल स्वच्छता संकल्पना आणली आहे. एसटी बस आता आतून बाहेरून घासूनपुसून नियमित स्वच्छ केली जाणार आहे. यासाठी शाम्पू, सोड्याचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या या संकल्पनेतून महामंडळाची प्रतिमाही उंचावण्याचा प्रयत्न आहे. राज्यात महामंडळाच्या १७ हजार बसेस धावतात. तशा नेहमीच बसेस धुतल्या जातात. पण, कोरोना महामारीच्या काळात स्वच्छतेला प्राप्त झालेले महत्त्व पाहता, त्यात सखोलता आणण्यात आली आहे.  प्रवासी बसलेल्या ठिकाणापासूनही कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही साखळी तोडण्यासाठी साबणाच्या पाण्याने बसचे आसन, पाठ टेकतो तो भाग घासून साफ केला जाणार आहे.

साबणाच्या पाण्याने कोविड नष्ट होतो, या गृहितकावर आधारित सखोल स्वच्छतेची ही संकल्पना परिवर्तन बसेसपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात प्रत्येक बस याच पध्दतीने स्वच्छ केली जाणार आहे. यामुळे नागरिक एसटीने बिनधास्त प्रवास करतील, असा विश्वास महामंडळाला आहे. खिडक्यांची तावदाने, आसनाच्या समोरील ग्रीप हॅन्डल हे भाग नारळाच्या काथ्या, नायलॉनचा फोम ब्रश याद्वारे स्वच्छ केले जाणार आहेत. फेसयुक्त पाण्यामुळे संपूर्ण बस निर्जंतूक होईल, आतून बाहेरून धुलाईमुळे कळकटलेली बस स्वच्छ होण्यासोबतच मळकट वासही निघून जाईल, असा विश्वास महामंडळाला आहे.

बस धुलाईचे प्रशिक्षणबस कशी धुवावी, याचे सखोल मार्गदर्शन कामगारांना करण्यात आले आहे. सोडा आणि शाम्पूच्या फेसाने बस आतून बाहेरून घासून घ्या, स्पंज अथवा साध्या कापडाने फेसयुक्त पाण्याद्वारे खिडकीच्या काचा पुसा, पाण्याच्या फवाऱ्याने संपूर्ण बस स्वच्छ धुऊन टाका अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Bus Driverबसचालकcorona virusकोरोना वायरस बातम्या