शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील विद्यार्थी काळाची गरज

By admin | Updated: September 28, 2016 00:51 IST

भारत हा शांतताप्रिय देश आहे. नवी पिढीही शांतताप्रिय आणि संवेदनशील घडविण्याची गरज आहे.

चिंतामण वंजारी : अकरावी पुनर्रचित भाषा विषयाची कार्यशाळायवतमाळ : भारत हा शांतताप्रिय देश आहे. नवी पिढीही शांतताप्रिय आणि संवेदनशील घडविण्याची गरज आहे. ही जबाबदारी प्रामुख्याने शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले.स्थानिक नारायण माकडे हायस्कूल व स्व. रामभाऊ ढोले विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी कार्यशाळा पार पडली. यावेळी चिंतामण वंजारी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता अकरावीच्या पुनर्रचित भाषा अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाबाबत यावेळी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून मराठी विषय अभ्यास मंडळ सदस्य डॉ. प्रा. माधुरी काळे (वर्धा), शिक्षण निरीक्षक चंद्रप्रकाश वाहणे, विज्युक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दत्तात्रय जयपूरकर, जिल्हा सचिव प्रा. प्रकाश लामणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, प्राचार्य विजय सातपुते, तज्ज्ञ मार्गदर्शन प्रा. रमेश वाघमारे, प्रा. गणेश थोरात, प्रा. अशोक पाटील, प्रा. अरुण बुंदेले आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी लेखन, गद्य व पद्य विभाग, व्यक्तिचित्र, उपयोजित मराठी व प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपावर सखोल माहिती देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील २०० शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक चंद्रप्रकाश वाहणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अशोक पांडे यांनी केले. तर आभार प्राचार्य विजय विसपुते यांनी मानले. कार्यशाळेच्य यशस्वितेसाठी प्रा. मेघा खालगोने, प्रा. नमिता चव्हाण, प्रा. भारती ढुके, प्रा. वैशाली लिंगायत, श्याम जतकर, रुपेश लोखंडे, अनिल गुल्हाने, बाबाराव मरस्कोल्हे, अंकुश जिरापुरे, रोशन बुटके आदींनी परिश्रम घेतले. (स्थानिक प्रतिनिधी)