राष्ट्रीय महामार्गाला सहा महिन्यातच भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:07+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते विकास बांधकामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदारवार आम्ही गंभीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. मात्र महागाव परिसरात तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. सहा महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याला भेगा पडत आहे.

Send the National Highway in six months | राष्ट्रीय महामार्गाला सहा महिन्यातच भेगा

राष्ट्रीय महामार्गाला सहा महिन्यातच भेगा

Next
ठळक मुद्देनागपूर-बोरी-तुळजापूर मार्ग : अंबोडा ते खडकादरम्यान झाली दुर्दशा, चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सुरू आहे. अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत अंबोडा ते खडका दरम्यान सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्याने या रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते विकास बांधकामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदारवार आम्ही गंभीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. मात्र महागाव परिसरात तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. सहा महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याला भेगा पडत आहे. त्यामुळे हा रस्ता खरोखरच दावा केल्याप्रमाणे २० वर्ष टिकणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे.
कामात अनियमितता होत असल्याचे दिसत आहे. याकडे बांधकामावर देखरेख करणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का हेही निरूत्तरीत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. अतिशय मंदगतीने काम केल्या जात आहे. रस्ता बांधकामात वापरल्या जाणारे साहित्य योग्य दर्जाचे आहे का, रस्त्यावर मधोमध भेगा पडल्या असल्याचे स्पस्ट पणे दिसत आहे. अंदाजपत्रका नुसार योग्य प्रकारचे दजेर्दार साहित्य वापरने गरजेचे आहे. या कामाची पारदर्शकता अनेक वाहनधारकाना दिसून आली आहे.हा सर्व प्रकार पाहता सबंधित कामाकडे शासकीय अभियंत्याचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. एकंदरच हजारो कोटीच्या या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संभ्रम आहे.

Web Title: Send the National Highway in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.