शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट खेड्यातील गरीब दारात धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात रुग्ण वाढीला वेग आला. अजूनही ग्रामीण भागाच्या तुलनेत यवतमाळ आणि पुसद शहरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र मागील वर्षीचा विचार करता इतरही चौदा तालुके विशेषत: तालुक्यांमधील अत्यल्प लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये रुग्ण वाढले आहेत. केवळ खेड्यापाड्यांमध्ये सहा हजार रुग्ण आढळले. त्यात २०० रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देखेड्यांमध्ये सहा हजार रुग्ण, २०० मृत्यू : कष्टकऱ्यांनाही विषाणूने वेढले, सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सुरुवातीला गर्भश्रीमंतांनाच बाधित करणारा कोरोना आता गोरगरिबांच्या घरात शिरला आहे. सुरुवातीला मुंबई, पुणे, नागपूर सारख्या महापालिका क्षेत्रात फैलावलेला कोरोना यावेळी मात्र गावखेड्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, पांढरकवडा सारखी शहरे सर्वाधिक बाधित झाली होती. मात्र सध्याच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने खेड्यातील गोरगरिबांची घरी गाठली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही रुग्ण शोधताना, कोविड सेंटरपर्यंत आणताना नाकीनऊ येत आहेत. फेब्रुवारीच्या मध्यापासून जिल्ह्यात रुग्ण वाढीला वेग आला. अजूनही ग्रामीण भागाच्या तुलनेत यवतमाळ आणि पुसद शहरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र मागील वर्षीचा विचार करता इतरही चौदा तालुके विशेषत: तालुक्यांमधील अत्यल्प लोकसंख्येच्या खेड्यांमध्ये रुग्ण वाढले आहेत. केवळ खेड्यापाड्यांमध्ये सहा हजार रुग्ण आढळले. त्यात २०० रुग्णांचा मृत्यू झाला. पांढरकवडा तालुक्यातील वांजरी या छोट्याशा खेड्यात १०० पेक्षा अधिक कोरोना संक्रमित आढळल्याने यंत्रणेची झोप उडाली. वांजरीसारखी अनेक खेडी कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे.  विरळ लोकवस्ती, अंगमेहनतीची कामे, प्रतिकारशक्ती अशा जमेच्या बाजू असूनही खेड्यांत कोरोना पसरत आहे. 

तापाचे रुग्ण घरात दडून गंभीर म्हणजे पूर्वीपेक्षा कोरोनाची दुसरी लाट जास्त तीव्र होऊन आली आहे. मागील वर्षी कोरोना अस्तित्वातच नाही, असा अनेक ग्रामीण माणसे दावा करीत होती. मात्र यंदा खेड्यातीलच संक्रमन पाहून तेही गर्भगळीत झाले आहेत. घाटंजी, आर्णी, दिग्रस, महागाव, वणी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यांमध्ये सध्या तापाची साथ सुरू झाली आहे. मात्र कोरोनाच्या धास्तीने अनेक जण घरच्या घरीच उपचार करून घेत आहेत. कोरोना चाचणीबाबत अजूनही अनेकांच्या मनात गैरसमज कायम असल्याने हे साध्या तापाचेही रुग्ण घरात दडून बसले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या