कृषी अधिकाऱ्यांकडून बोगस बियाण्यांचा सर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:18+5:30

तालुक्यात विविध कंपन्यांची बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागातील तज्ज्ञांनी सावरगाव(काळे), व्याहाळी, अडगाव आदी ३० गावातील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.

Search for bogus seeds by agricultural authorities | कृषी अधिकाऱ्यांकडून बोगस बियाण्यांचा सर्च

कृषी अधिकाऱ्यांकडून बोगस बियाण्यांचा सर्च

Next
ठळक मुद्देनेरमध्ये पाहणी : शेतकऱ्यांकडून संताप

लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करत पंचनामे केले. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी लावून धरली.
तालुक्यात विविध कंपन्यांची बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात झाल्या आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदविल्या. महाबीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागातील तज्ज्ञांनी सावरगाव(काळे), व्याहाळी, अडगाव आदी ३० गावातील शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
तालुका कृषी अधिकारी नामदेव कुमरे, महाबीजचे क्षेत्रीय अधिकारी व्ही.पी. भागवत, पी.पी. देशमुख आदींनी पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत पाटील यांनी महाबीजच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. त्यावर बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. बियाणे नसेल तर तेवढी रक्कम द्या, अशी मागणी जैत यांनी केली. बियाणे बोगस निघाले असल्यास शेतकऱ्यांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Web Title: Search for bogus seeds by agricultural authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती