ती माझी आहे म्हणत, युवकाला आत्महत्येस केले प्रवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 22:48 IST2022-11-17T22:31:21+5:302022-11-17T22:48:08+5:30

तू ज्या मुलीसोबत विवाह केला ती माझी प्रेयसी आहे. तू आत्महत्या कर, नंतर मी तिच्याशी विवाह करतो, असे केले नाही तर तुला जिवानिशी ठार करतो, अशा  स्वरूपाच्या धमक्या आरोपी सुनील राठोड (२२, रा. आकोली, ता. उमरखेड) याच्याकडून देण्यात येत होत्या. सुनील अनंताला मोबाईलवर फोन करून, एसएमएस  करून सातत्याने धमकावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या अनंताने १५ नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.

Saying that she is mine, the youth was induced to commit suicide | ती माझी आहे म्हणत, युवकाला आत्महत्येस केले प्रवृत्त

ती माझी आहे म्हणत, युवकाला आत्महत्येस केले प्रवृत्त

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ती माझी आहे, तू तिच्यासोबत लग्न केलेस, आता तू आत्महत्या कर नाही तर तुला ठार करतो, अशा धमक्या देऊन नवविवाहित युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडले. ही गंभीर घटना उमरखेड तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी २२ वर्षीय युवकाविरुद्ध उमरखेड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
अनंता सुभाष खापरे (२४) असे या मृत युवकाचे नाव आहे. त्याचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, नंतर त्याला एका मोबाईलवरून वारंवार धमक्या मिळू लागल्या. तू ज्या मुलीसोबत विवाह केला ती माझी प्रेयसी आहे. तू आत्महत्या कर, नंतर मी तिच्याशी विवाह करतो, असे केले नाही तर तुला जिवानिशी ठार करतो, अशा  स्वरूपाच्या धमक्या आरोपी सुनील राठोड (२२, रा. आकोली, ता. उमरखेड) याच्याकडून देण्यात येत होत्या. सुनील अनंताला मोबाईलवर फोन करून, एसएमएस  करून सातत्याने धमकावत होता. त्यामुळे कंटाळलेल्या अनंताने १५ नोव्हेंबरच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुभाष खापरे यांनी पोलिसांत तक्रार देऊन मुलाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या युवकाविरुद्ध कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कलम ३०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे. 
दरम्यान, तरुणाच्या या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे एकाचा जीव गेला, तर दोघांचे आयुष्यही  उद्‌ध्वस्त झाले आहे. 

प्रेमासाठी वाट्टेल ते..
- प्रेमासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही. एकतर्फी प्रेमातून विवाहितेचा संसार मोडण्याचे काम युवकाने केले. आता तो स्वत: गंभीर गुन्ह्यात आरोपी झाला आहे. या विचित्र घटनेने उमरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. नेमके काय साध्य केले, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

 

Web Title: Saying that she is mine, the youth was induced to commit suicide