शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

चारही तालुक्यात संततधार

By admin | Updated: September 8, 2014 01:48 IST

वणीसह मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे.

वणी : वणीसह मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने या चारही तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, पैनगंगा, खुनी, निर्गुडा नद्यांना पूर आला आहे. याशिवाय नवरगाव आणि सायखेडा धरण ओव्हर फ्लो झाले आहे.वणी, मारेगाव, झरीजामणी आणि पांढरकवडा तालुक्यात गेलया २४ तासांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास या पावसाला सुरूवात झाली. सुरुवातीला जोर नसलेल्या पावसाने सायंकाळपासून चांगलाच जोर पकडला. त्यानंतर रात्रभर सतत पाऊस कोसळत होता. आज रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर पकडला. या पावसामुळे वणी तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी वर्धा नदी चांगलीच फुगली आहे. सोबतच शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदीही दुथडी भरून वाहात आहे. वर्धा नदीसोबतच निर्गुडा नदीला पूर आल्याने सोमवारी गणेश विसर्जन करताना काळजी घ्यावी लागणार आहे.मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प संततधार पावसाने तुडूंब भरला आहे. हा प्रकल्प सध्या ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे निर्गुडा नदीलाही पूर आला आहे. मारेगाव तालुक्यातील इतर सर्व नालेही पावसाने तुडूंब भरले आहेत. झरीजामणी तालुक्यातही हिच स्थिती आहे. तालुक्यातील सर्व छोटे-मोठे नाले दुथडी भरून वाहात आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रविवारी ग्रामस्थांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते. शेतकऱ्यांना शेतात जाणेही जमले नाही.पांढरकवडा तालुक्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदीही दुथडी भरून वाहात आहे. या नदीला पूर आला आहे. संततधार पावसाने शनिवारी सायंकाळपासूनच नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढू लागला होता. याशिवाय खुनी नदीलाही पूर आला आहे. ही नदी दुथडी भरून वाहात आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावीत झाली आहे. याशिवाय तालुक्यातील सायखेडा धरण ओव्हर फ्लो झाले आहे. या धरणातून अतिरिक्त पाण्याचा प्रवाह वाहात आहे.वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा या चारही तालुक्यात रविवारी पावसाने कहर केला. संततधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम पडला. महामंडळाच्या अनेक बस विलंबाने सुटल्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. अनेक प्रवासी बसस्थानकातच अडकून पडले होते. पाऊस थांबत नसल्याने अनेकांना परत जाणेही अशक्य झाले होते. त्यामुळे त्यांची त्रेधातिरपीट उडाली होती. संततधार पावसाने या चारही तालुक्यातील पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. सुरूवातीला दडी मारलेल्या पावसाने पोळ्यापासून दमदार पुनरागमन केले होते. सतत चार दिवस पाऊस पडत होता. त्यानंतर जवळपास तीन ते चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा शनिवारपासून संततधार पावसाला सुरूवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. त्याचा परिणामी जनीजीवनावर झाला. मात्र सुटीचा दिवस असल्याने बच्चे कंपनी व कर्मचाऱ्यांना पावसापासून दिलासा मिळाला. (कार्यालय प्रतिनिधी)