शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचा टिप्पर उलटून चार मजूर दबले, एका तरुणाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

सुरेश वासुदेव कोमटी (२२) रा. वाघापूर असे मृत युवकाचे नाव आहे. तो टिप्परवर मजूर म्हणून काम करीत होता. एमएच-३१-सीबी-८३४६ क्रमांकाच्या टिप्परवर सुरेश हा आपले वडील व दोन सहकाऱ्यांसह पिंटू डगवार याच्या घराजवळ रेती टाकण्यासाठी जात होता. दरम्यान अंधारात टिप्पर चालकाला खड्डा दिसला नाही. त्यातच हा टिप्पर पलटी झाला. रेतीवर बसून असलेले चौघेही रेतीखाली दबल्या गेले. तिघांना कसेबसे बाहेर काढण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी सुरू आहे. मंगळवारी रात्री ३ वाजता पिंपळगाव परिसरातील डोनाडकर ले-आऊटमध्ये रेतीची खेप घेऊन आलेला टिप्पर उलटला. यात चौघे जण रेतीच्या ढिगाऱ्याखाली दबले. त्यामध्ये एका २२ वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण सुदैवाने बचावले. चोरीच्या रेतीचा भंडाफोड होऊ नये म्हणून सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. अखेर दुपारी ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.सुरेश वासुदेव कोमटी (२२) रा. वाघापूर असे मृत युवकाचे नाव आहे. तो टिप्परवर मजूर म्हणून काम करीत होता. एमएच-३१-सीबी-८३४६ क्रमांकाच्या टिप्परवर सुरेश हा आपले वडील व दोन सहकाऱ्यांसह पिंटू डगवार याच्या घराजवळ रेती टाकण्यासाठी जात होता. दरम्यान अंधारात टिप्पर चालकाला खड्डा दिसला नाही. त्यातच हा टिप्पर पलटी झाला. रेतीवर बसून असलेले चौघेही रेतीखाली दबल्या गेले. तिघांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. सुरेश मात्र निपचित पडला होता. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. सुरुवातीला लोहारा पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल केला. नंतर सुरेशच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. अवैध रेती तस्करीनेच सुरेशचा बळी घेतल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात