शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

उमरखेडमध्ये रेती तस्करांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 21:37 IST

तालुक्यात रेती तस्करांनी अक्षरशा: हैदोस घातला आहे. प्रशसनाच्या संगनमताने तस्कर रात्रभर रेतीचा उपसा करून दिवसा त्याची बिनबोभाटपणे वाहतूक करीत आहे.

ठळक मुद्देरात्रभर उपसा : साखरा येथे साठा, महसूल प्रशासनाची जाणीवपूर्वक डोळेझाक

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यात रेती तस्करांनी अक्षरशा: हैदोस घातला आहे. प्रशसनाच्या संगनमताने तस्कर रात्रभर रेतीचा उपसा करून दिवसा त्याची बिनबोभाटपणे वाहतूक करीत आहे.तालुक्यातील काही ठरावीक रेती वाहतुकदारांना महसूल प्रशासनाचा वरदहस्त लाभला आहे. त्यामुळे संधीचे सोने करण्यासाठी रेती माफियांनी कंबर कसली आहे. साखरा रेती घाटावर रात्रभर रेतीचा उपसा केला जातो. गेल्या आठवड्यापासून या घाटावर वाहनांची रेलचेल आहे. रात्री उपसा केलेली रेती दिवसभर वाहून नेली जाते. ती खुलेआमपणे विकली जाते. मात्र महसूल प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत वावरत आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरुन वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात महसूलशी आर्थिक साटेलोटे करुन रेती तस्कर उपसा करीत आहे. साखरा रेती घाटावर रात्रभर ट्रॅक्टर, टिप्परची वर्दळ वाढली आहे. उपसा केलेली रेती पात्राबाहेरील पंचनामा केलेल्या जुन्या नाममात्र ढिगाºयावर टाकली जाते. नंतर दिवसा पावत्यांचा वापर करून या तस्करीच्या रेतीची विल्हेवाट लावली जाते. हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. महसूल अधिकाºयांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी महागाव व इतरत्र दूरवर पथक पाठवून काही रेती तस्करांविरुद्ध कारवाई केली. मात्र सत्ता व राजकीय वजनाचा वापर करणाºया येथील रेती तस्करांकडे कानाडोळा चालविला आहे. केवळ नवख्या व भुरट्या तस्कराविरुद्ध कारवाई करून महसूल विभाग धन्यता मानत आहे.मर्जीतील तस्करांना ‘खुली छूट’आपल्या मर्जीतील सराईत रेती तस्करांना महसूलने रान मोकळे सोडले आहे. त्यांना एकप्रकारे खुली छूट दिली आहे. महसूलच्या भरारी पथकातीलच काही कर्मचारी वारंवार रेती तस्करांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काही अधिकाऱ्यांनीही तस्करांसोबत ‘मधुर’ संबंध जोपासले आहे. परिणामी तालुक्यातील काही रेती घाटांवर रेती तस्करी चांगलीच वाढली आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल पाण्यात बुडत आहे. महसूलचे अधिकारी व कर्मचारी मात्र निर्धास्त आहे.

टॅग्स :sandवाळू