शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

राम जेठमलानींच्या स्मृतींनी गहिवरले जिल्ह्याचे विधी वर्तुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM

निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प राम जेठमलानी यांच्या अनुभवसंपन्न वक्तृत्वाने गाजविले.

ठळक मुद्देपटवून दिले धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व : जवाहरलाल दर्डा स्मृतिदिनानिमित्त गाजले व्याख्यान

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातील मातब्बर वकील आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री राम जेठमलानी यांच्या निधनाचे वृत्त धडकताच जिल्ह्याच्या विधी वर्तुळात काम करणारी प्रत्येक व्यक्ती गहिवरली. कारण अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या ज्येष्ठ विधिज्ञाने अगदी काही वर्षापूर्वीच यवतमाळसारख्या ठिकाणी येऊन ग्रामीण भागात विधीसेवा देणाऱ्यांचे कान तृप्त केले होते.निमित्त होते स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे. तो दिवस होता २४ नोव्हेंबर २०१३. येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयात विधी व न्याय शास्त्र ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प राम जेठमलानी यांच्या अनुभवसंपन्न वक्तृत्वाने गाजविले. ‘भारतीय घटनेंतर्गत धर्मनिरपेक्षता’ हा त्यांचा विषय होता.या व्याख्यानाच्या निमित्ताने जिल्हाभरातील न्यायाधीश, वकील, कायद्याचे अभ्यासक, महाविद्यालयीन विद्यार्थी या सर्वांना सुवर्णसंधी चालून आली होती. त्यामुळेच हे व्याख्यानही अविस्मरणीय ठरले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा होते. तर व्यासपीठावर विद्या प्रसारक मंडळाचे सचिव अ‍ॅड. प्रकाश चोपडा, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा उपस्थित होते.प्रेरणास्थळी वृक्षारोपणविधी महाविद्यालयातील व्याख्यानापूर्वी अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी प्रेरणास्थळावर येऊन स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण केली. तसेच प्रेरणास्थळ परिसरात त्यांनी वृक्षारोपणही केले. याभेटीच्या निमित्ताने यवतमाळातील कायद्याच्या अभ्यासकांना अ‍ॅड. राम जेठमलानी यांचा अत्यंत जवळून सहवास लाभला त्या संदर्भात बोलताना अ‍ॅड. प्रवीण जानी म्हणाले, या व्याख्यानामुळे आम्हाला कधीही न संपणारी शिदोरी मिळाली. तर डॉ. विजेश मुणोत म्हणाले, कायद्यासारखा विषय असूनही अ‍ॅड. राम जेठमलानी यांनी सर्वांना कळेल अशा नर्मविनोदी पद्धतीने व्याख्यान दिले होते. हे व्याख्यान जिल्हावासीयांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.विजय दर्डा यांच्या हस्ते हृदयस्पर्शी स्वागतयावेळी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी खासदार विजय दर्डा यांनी गौरवपत्र प्रदान करून राम जेठमलानी यांचे यवतमाळकरांच्यावतीने हृदयस्पर्शी स्वागतही केले होते. त्यानंतर यवतमाळ बार असोसिएशनच्यावतीने अ‍ॅड.ए.पी. दर्डा, सिंधी समाजाच्यावतीने अ‍ॅड. जे.व्ही. वाधवाणी, अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.विजेश मुणोत यांनीही स्वागत केले.कार्ल मार्स्कने धर्माला अफुची गोळी संबोधले असले तरी भारतीय संविधान सभेने धर्माबाबत अतिशय चांगली तरतूद केली आहे. भारतीय संविधान आपल्याला धार्मिक सहिष्णुता शिकविते. धर्म प्रसारित करण्याची आपल्या संविधानात तरतूदही आहे. कुणी व्यक्ती आपल्या धर्म प्रसाराचे काम करीत असेल तर आपण त्याला खंजीर मारत नाही. त्याची गरजही नाही. कारण आपल्या संविधानाने युक्तीवाद करण्याची मुभा आपल्याला दिली आहे.- अ‍ॅड. राम जेठमलानी(यवतमाळ येथे २४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिलेल्या व्याख्यानातील एक अंश)

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा