शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

जिल्ह्यातील आठ हजार विहिरींचे पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:28 PM

जिल्ह्यातील रद्द झालेल्या आठ हजार सिंचन विहिरींना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंजुरी बहाल करून त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून आढावा : पोलिसांच्या घराचा प्रश्नही निकाली निघणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील रद्द झालेल्या आठ हजार सिंचन विहिरींना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा मंजुरी बहाल करून त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूर येथील विधान भवनात यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यात १६ हजार सिंचन विहिरींचे बांधकाम अपेक्षित होते, असे स्पष्ट केले. त्यापैकी केवळ आठ हजार विहिरी पूर्ण झाल्या. उर्वरित आठ हजार विहिरी रद्द करण्यात आल्या. या रद्द विहिरींना पुन्हा मंजुरी देऊन त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. यामुळे जिल्ह्यात मोठे शेती क्षेत्र सिंचनाखाली येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. नवीन विहिरींसाठी दीडशे मीटरची मर्यादा सोडून सर्व निकष शिथील करण्यात आले. शेतकरी विहीर पूर्ण करण्यास इच्छुक नसल्यास त्या दुसऱ्या शेतकऱ्यांना बहाल करून उद्दीष्ट पूर्ण करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, रमाई, कोलाम घरकूल योजनांची गती वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पोलीस गृहनिर्माण व नवीन पोलीस ठाण्याबाबत गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिसांच्या घरांचा प्रश्न लवकरच निकाली काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत शेततळे, धडक विहिरी, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, समृद्धी महामार्ग, जलसिंचन प्रकल्प, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषीपंप वीज जोडणी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, ग्रामीण पेयजल योजना, पीक कर्ज आढावा, पीक विमा योजना, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आदींचा आढावा घेतला.या बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पालकमंत्री मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, आमदार मनोहरराव नाईक, ख्वाजा बेग, डॉ. तानाजी सावंत, राजेंद्र नजरधने, डॉ. अशोक उईके, राजू तोडसाम, संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आदी उपस्थित होते. विविध विभागाच्या अधिकाºयांनी योजनानिहाय माहिती दिली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस