शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी निवृत्त प्राचार्यांची धडपड

By admin | Updated: June 4, 2016 02:15 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. येथील सेवानिवृत्त प्राचार्य ..

ना. म. जवळकर : पेन्शनच्या पैशातून प्रबोधनाचे कार्यदारव्हा : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. येथील सेवानिवृत्त प्राचार्य ना. म. जवळकर यांनीसुद्धा स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी प्रबोधन सुरू केले आहे. त्यांनी आपल्या पेन्शनच्या पैशातून ‘शेतकरी मित्रा तू असा मरू नकोस’ अशा आशयाची दोन लाख पत्रके छापून संपूर्ण जिल्ह्यात वितरित केली. त्यांचे हे कार्य अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात सतत घडणाऱ्या या घटनांमुळे येथील सेवानिवृत्त प्राचार्य नारायण महादेवराव जवळकर यांचे मन सुन्न झाले. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरूच आहे. परंतु जगाचा पोशिंदा मृत्यूला कवटाळत असल्याने जवळकर यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. या समाजाचा घटक म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा, अशी गाठ त्यांनी मनाशी बांधली.त्यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे याकरिता आत्महत्या हा पर्याय नाही. संकटातून मार्ग निघतोच. आत्महत्येनंतर कुटुंबाचे काय हाल होतात, अशा प्रकारचे भावनिक आवाहन करणारे पत्रक तयार केले आणि वितरणाला सुरुवात केली. जिल्ह्यातील खेड्यापाड्यात पत्रके पोहोचती केली. आपल्या एसटी बसमधील प्रवासात ते प्रवाशांना स्वत: पत्रके वाटतात.त्यांचे हे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरू असून आतापर्यंत तब्बल दोन लाख पत्रके वाटली आहे. त्यांना अनेकांनी फोन करून या कार्याचा गौरव केला आहे. प्रशासनानेसुद्धा ना.म. जवळकर यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेवून त्यांना बळीराजा चेतना अभियानांतर्गत पुरस्कार देवून गौरव केला आहे. पेन्शनच्या पैशातून शेतकरी आत्महत्येसारख्या महत्त्वाच्या विषयासाठी त्यांची ही धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. (तालुका प्रतिनिधी)