शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
3
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
4
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
5
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
6
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
7
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
8
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
9
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
10
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
11
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
12
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
13
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
14
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
15
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
16
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
17
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
18
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
19
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
20
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजार शेतकऱ्यांची रिसोर्स बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

यवतमाळ जिल्ह्यासाठी खताचे अतिरिक्त दोन रॅक पॉर्इंटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळाली आहे. युरिया व इतर कुठलेही खत शेतकऱ्यांना कमी पडणार नाही. जिल्ह्यात ९९५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ४४ टक्के वाटप झाले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे ७०८ कोटी येणार आहे.

ठळक मुद्देकृषिमंत्र्यांचे बैठकीत निर्देश : रबी व उन्हाळी पिकाचे क्षेत्र वाढवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात नावीण्यपूर्ण प्रयोग करतात. अशा शेतकऱ्यांची यादीच तयार केली असून साडेतीन हजार शेतकरी रिसोर्स बँक म्हणून काम करणार आहे. ते इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतील. कृषी यंत्रणेने रबी व उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करावे व पीक पद्धतीतही बदल घडवावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.यवतमाळ जिल्ह्यासाठी खताचे अतिरिक्त दोन रॅक पॉर्इंटसाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्याला मंजुरी मिळाली आहे. युरिया व इतर कुठलेही खत शेतकऱ्यांना कमी पडणार नाही. जिल्ह्यात ९९५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. एकूण उद्दिष्टाच्या ४४ टक्के वाटप झाले आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे ७०८ कोटी येणार आहे. त्यासाठी ९८ हजार ४६२ शेतकºयांना पुन्हा कर्ज मिळणार आहे. पीक कर्जाला उशिर झाला. परंतु नियोजन केले जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत तीन लाख ३० हजार शेतकरी पात्र आहे. त्यापैकी दोन लाख ६३ हजार शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे. पीक विम्याच्या मुद्यावर संजय राठोड यांनी सूचना केल्या होत्या. त्याबाबतही केंद्र सरकारच्या नव्या निर्देशानुसार पीक विमा तीन वर्षांसाठी व ऐच्छिक राहणार आहे. जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बांधावर खते व बियाणे हा उपक्रम यशस्वी झाला. बियाण्याबाबत तीन हजार ९९६ तक्रारी आल्या आहे. यासंदर्भाने गुन्हा नोंदविणे, परवाना रद्द करणे, अशी कारवाई सुरू असल्याचे ना.भुसे यांनी सांगितले. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSanjay Rathodसंजय राठोड