शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

आरएफओंकडील अडीच कोटींची वसुली थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत २०११-१२ मध्ये झरी तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे केली गेली होती. मात्र मातीकाम, अनगड दगडी बांध या कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ३५ पैकी ३४ अधिकारी-कर्मचाºयांवर ठपका ठेवला गेला. झरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी ३२७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. ३४ पैकी चार वनरक्षक व एक वनपाल यांना बडतर्फ केले गेले होते.

ठळक मुद्देझरी तालुक्यातील रोहयो घोटाळा : ठपका असूनही २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : झरी तालुक्यात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाला. चौकशीअंती वन व महसूल अधिकाऱ्यांवर दोन कोटी ५७ लाख ४२ हजार १३६ रुपयांची वसुली निश्चित करण्यात आली. परंतु गेल्या दीड वर्षांपासून ही वसुली थंडबस्त्यात ठेवण्यात संबंधित अधिकाºयांनी यश मिळविले.पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत २०११-१२ मध्ये झरी तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे केली गेली होती. मात्र मातीकाम, अनगड दगडी बांध या कामांमध्ये अनियमितता, गैरव्यवहार झाला. या प्रकरणात ३५ पैकी ३४ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवला गेला. झरीच्या तत्कालीन तहसीलदारांनी ३२७ कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. ३४ पैकी चार वनरक्षक व एक वनपाल यांना बडतर्फ केले गेले होते. अपिलानंतर शासनाने त्यांना पुन्हा सेवेत घेतले. मात्र उर्वरित २९ जणांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही.या रकमेची वसुली गेल्या काही वर्षांपासून थंडबस्त्यात आहे. ही वसुली थंडबस्त्यात ठेवण्यामागे यातील अधिकाऱ्यांच्या मुंबईतील येरझारा महत्वपूर्ण ठरल्याचे सांगितले जाते. शासन कोरोनामुळे आर्थिक टंचाईचा सामना करीत असताना अडीच कोटींच्या या रकमेची वसुली करण्यात मंत्रालयातील नियोजन विभागाचा (रोहयो-२) इन्टरेस्ट का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरएफओ मळघणे सध्या उमरखेडला कार्यरत आहे.उमरखेड ‘आरएफओ’कडे सर्वाधिक एक कोटीया प्रकरणी तत्कालीन तीन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर वसुलीची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक एक कोटी १७ लाख ७४ हजार रुपये उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी विठ्ठल मळघणे यांच्याकडे आहे. आरएफओ ए.ओ. मेत्रे (सेवानिवृत्त) ९० लाख ७१ हजार ४६४ रुपये तर ए.ए. शेख यांच्याकडे ४८ लाख ९६ हजार ४७९ रुपयांची रिकव्हरी आहे. एकूण दोन कोटी ५७ लाख ४२ हजार १३६ रुपयांची ही वसुली प्रलंबित आहे. त्यामागेसुद्धा ‘अर्थ’कारण असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :forest departmentवनविभाग