पदोन्नती रोखल्यास मान्यता रद्दचा इशारा
By Admin | Updated: July 17, 2015 02:37 IST2015-07-17T02:37:00+5:302015-07-17T02:37:00+5:30
उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नतीबाबत सेवा ज्येष्ठता निश्चित करून पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकाला पदोन्नती ...

पदोन्नती रोखल्यास मान्यता रद्दचा इशारा
शिक्षणाधिकारी : दीनबाई शिक्षण संस्था
दिग्रस : उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नतीबाबत सेवा ज्येष्ठता निश्चित करून पदोन्नतीस पात्र असलेल्या शिक्षकाला पदोन्नती न दिल्यास शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा येथील दीनबाई शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या मोहनाबाई कन्या शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना दीनबाई शिक्षण संस्थाच्या अध्यक्ष व सचिवांना दिलेल्या आदेशानूसार मोहनाबाई कन्या शाळेचे विद्यमान पर्यवेक्षक कैलास तानसा जाधव यांना सेवाज्येष्ठतेनुसार उपमुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्याकरिता कार्यालयाने वारंवार कळविले. परंतु संस्थेने सेवाज्येष्ठतेचा अहवाल संस्थेने सादर केला नाही. त्यामुळे महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियमावलीचा भंग केला. तसेच कैलास जाधव हे अनुसूचित जाती या प्रवर्गातील शिक्षक असून सेवाज्येष्ठता बाबतचा त्यांचा हक्क डावलण्यात आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी दीनबाई शिक्षण संस्थेची राहील, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास शाळेची मान्यता काढण्यात रद्द करण्यात आल्यास त्यांची जबाबदारी अध्यक्ष व सचिव यांची राहील असे या आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)