राज ठाकरे यांची यवतमाळातील नेर गावाला धावती भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 10:33 IST2018-10-22T10:33:16+5:302018-10-22T10:33:53+5:30

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील नेर या गावातून जात असताना तेथील मनसे कार्यकर्त्यांना धावती भेट दिली.

Raj Thackeray's visit to Ner village of Yavatmal | राज ठाकरे यांची यवतमाळातील नेर गावाला धावती भेट

राज ठाकरे यांची यवतमाळातील नेर गावाला धावती भेट

ठळक मुद्देमनसे कार्यकर्त्यांना केले अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळी १० च्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील नेर या गावातून जात असताना तेथील मनसे कार्यकर्त्यांना धावती भेट दिली. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आयोजित पक्षाच्या कार्यक्रमासाठी जात असताना वाटेत लागलेल्या नेर येथे त्यांनी अवघ्या दोन -तीन मिनिटांचा थांबा घेतला. याप्रसंगी नेरचे मनसेचे प्रमुख मनोज ठाकरे, नलिनी झोपाटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत केले. याप्रसंगी राज ठाकरे यांनी कुठलेही मार्गदर्शन वा वक्तव्य केले नाही. राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दिपीका झोपाटे, गीतांजली राठोड, प्रकाश डहाके, गणेश टेकाम, प्रमोद राठोड आदी उपस्थित होते. आज संध्याकाळी वणी येथील बैठक आटोपून राज ठाकरे यवतमाळ येथील जिल्हास्तरीय बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

 

Web Title: Raj Thackeray's visit to Ner village of Yavatmal