शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वत्र पावसाची रिपरिप सुरूच

By admin | Updated: July 16, 2014 00:29 IST

दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या

वणी : दीड महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वणी, मारेगाव, पांढरकवडा, झरीजामणी तालुक्यात १४ जुलैच्या सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दमदार आणि मुरवणी पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. शेती पिकांसाठी हा पाऊस समाधानकारक असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा प्रचंड अडचणीत सापडला आहे़ पावसाळ्याच्या दीड महिन्याच्या कालावधीत मोजून तीनच वेळा पाऊस पडला़ पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी जोमाने खरीपातील कपाशीची पेरणी केली. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी बळीराजावर दुबारच नव्हे तर तिबार पेरणी करण्याचे संकट ओढवले. त्यासाठी त्यांना सावकारांचे उंबरठे झीजवावे लागले. घरातील लक्ष्मीचे असले-नसले सोने गहाण ठेवावे लागले. त्यातून दुबार, तिबार पेरणीसाठी कशी तरी त्यांनी बियाण्यांची तजवीज केली. मात्र दुबार, तिबार पेरणी करूनसुध्दा पाऊस न आल्याने पेरलेले बियाणे मातीतच सडले. त्यामुळे बळीराजाला प्रचंड आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.आता दोन दिवसांपासून शेती पिकांना पोषक असा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा जिवात जीव आला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. गेल्या २४ तासांपासून पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. मात्र आता बहुतांश शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नसल्याने पुन्हा नव्याने पेरणी कशी करावी, असा यक्षप्रश्न त्यांना सतावत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजाची धडपड सुरू झाली आहे. कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची नाजूक आर्थिक स्थिती बघता बियाणे संपल्याच्या पाट्या लावल्या आहेत. त्यांना उधारीत बियाणे द्यायला ते तयार नाही़ ज्या शेतकऱ्यांकडे पैसे आहे, त्यांना मात्र मागच्या दारातून बियाणे मिळत आहे़ आता बियाणे घ्यायला शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या बियाण्याअभावी पडित राहण्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ (लोकमत चमू )