पतसंस्थांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:19 IST2018-07-16T22:19:40+5:302018-07-16T22:19:58+5:30

महाराष्ट्रातील पतसंस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थमंत्री पीयूष गोयल, ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्त्वात भेट घेऊन चर्चा करण्यात आली.

Questions of credit institutions in the Council of Ministers | पतसंस्थांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारात

पतसंस्थांचे प्रश्न मंत्र्यांच्या दरबारात

ठळक मुद्देशिष्टमंडळ भेटले : राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्रातील पतसंस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. अर्थमंत्री पीयूष गोयल, ना. नितीन गडकरी यांची नागपूर येथे पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्त्वात भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
भारत सरकारच्या अखत्यारित येणाºया विषयाच्या अनुषंगाने सेवा व वस्तू कर कलम ९(३) व ९(४) अंतर्गत प्रतिनिधीचे कमिशनवर आरसीएमच्या माध्यमातून लागणारे कर, आयकर कलम ८०(पी), गुंतवणुकीचे व्याजावरील आयकर, टीडीएस तसेच कलम २६९ एसटीचे माध्यमातून होणाºया त्रासाबद्दल मंत्र्यांना अवगत करण्यात आले.
पतसंस्था या देशामध्ये उत्तम काम करीत असून त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्याचा सल्ला ना. नितीन गडकरी यांनी पीयूष गोयल यांना दिल्या. पतसंस्थांच्या समस्या तत्काळ सोडवून न्याय देण्यात येईल, असे आश्वासन ना. पीयूष गोयल यांनी दिले. शिष्टमंडळात कार्याध्यक्ष राजुदास जाधव, डॉ. सुकेश झंवर, राजेंद्र घाटे, रवींद्र सातपुते आदींचा समावेश होता.

Web Title: Questions of credit institutions in the Council of Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.