शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

पुसद, उमरखेड विभागाला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:42 AM

पुसद/उमरखेड/महागाव/दिग्रस : पुसद व उमरखेड विभागातील पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्याला गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यात एकट्या महागाव तालुक्यात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देगहू, हरभरा नेस्तनाबूत : पुसदमध्ये दोन जनावरे मृत्युमुखी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/महागाव/दिग्रस : पुसद व उमरखेड विभागातील पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्याला गारपिटीने जोरदार तडाखा दिला. यात एकट्या महागाव तालुक्यात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळी वातावरण असून कधी अवकाळी पाऊस, तर कधी वादळी पाऊस येत आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पुसद, महागाव तालुक्याला गारपिटीने झोडपून काढले. यात पुसद तालुक्यातील दोन जनावरे मृत्यूमुखी पडली. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा यांनी गारपीटग्रस्त फुलवाडीला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत अ‍ॅड. गजानन देशमुख, इस्ताकभाई, विजय राठोड, बळीराम चव्हाण, सरपंच आदी उपस्थित होते.महागाव तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने १७ हजार हेक्टरवरील हरभरा, पाच हजार हेक्टरवरील गहू व पाचशे हेक्टरवरील संत्रा पिकाला गारपिटीचा तडाखा बसला. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणविर यांनी दिली. ज्या भागात मोठे नुकसान झाले, अशा शेतकºयांनी स्वत:हून नुकसानीची माहिती कृषी विभागाला द्यावी, असे आवाहनही रणविर यांनी केले. शेतकऱ्यांनी धीर न सोडता आलेल्या परिस्थितीचा सामना करून आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तहसीलशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार नामदेव इसाळकर यांनी केले.दिग्रस तालुक्यात सतत तीन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपीट सुरू असल्याने डेहणी, माळहिवरा, सेवादासनगर, धानोरा तांडा, मोख, आरंभी, विठाळा आदी परिसरातील पिकांना जबर तडाखा बसला. विशेषत: मंगळवारच्या गारपीटीने गहू, हरभरा, आंबा, टरबूज, केळी, संत्रा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.खासदार सातव यांचे एसडीओंना निवेदनउमरखेड, महागाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून गारपीट व वादळी पाऊस सुरू असल्याने पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी केली. या मागणीचे निवेदन उपविभायीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना दिले. गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. सोबतच झाडे उन्मळून पडली. अनेक घरांची परझड झाली. फळबागा नष्ट झाल्या. पानमळ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे तत्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना सरसकट ३५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी खासदार अ‍ॅड. सातव यांनी निवेदनातून केली. निवेदन देताना माजी आमदार विजय खडसे, राम देवसरकर, रमेश चव्हाण, बाळासाहेब चंद्रे, गोपाल अग्रवाल, अरविंद माने, अ‍ॅड. शिवाजी वानखेडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस