पुसद तालुक्यात इयत्ता बारावीचा निकाल ९५.१७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:01 IST2025-05-06T17:00:25+5:302025-05-06T17:01:17+5:30

७ शाळांचा १०० टक्के निकाल : उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम

Pusad taluka class 12th result 95.17 percent | पुसद तालुक्यात इयत्ता बारावीचा निकाल ९५.१७ टक्के

Pusad taluka class 12th result 95.17 percent

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद :
इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. तालुक्यात एकूण ३९ शाळांमधून ४०६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ३,८६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९५.१७ टक्के आहे. प्रावीण्य ४३९, प्रथम श्रेणी १७५३, द्वितीय श्रेणी १४०२ तर उत्तीर्ण २७२ विद्यार्थी आहेत. ७शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. 


शंभर टक्के निकालाच्या शाळांत मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय भोजला, शासकीय विज्ञान उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा हर्षी, उच्च माध्यमिक विद्यालय घाटोडी, मातोश्री कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर, हजरत उमर फारुक उर्दू उच्च माध्यमिक शाळा पुसद व गुरुकुल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर या शाळांचा समावेश आहे. इतरही शाळांनी आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे. 


पुसदला शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. यापूर्वी पुसदमध्ये केवळ तीन उच्च माध्यमिक विद्यालय होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेल्याने ग्रामीण भागातसुद्धा उच्च माध्यमिक शाळांचे जाळे विणल्या गेले. आता त्याची संख्या ३९ वर गेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी निकालात उत्तीर्ण झाले. 


महागाव, उमरखेडचा डंका

  • बारावीच्या निकालात उमरखेड व महागाव तालुक्याने यंदा बाजी मारली. महागाव तालुक्याचा निकाल ९७.५२ टक्के तर उमरखेडचा २७.३१ टक्के निकाल लागला आहे.
  • महागाव तालुक्यात २५५८ २ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २५५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यात २४८७विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.२५ तर मुलींची टक्केवारी सर्वाधिक २९.११ इतकी आहे.
  • उमरखेड तालुक्यात परीक्षेसाठी २७०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. २६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात २६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.२५ तर मुलींची टक्केवारी २८.५४ इतकी आहे. यंदा उमरखेड, महागाव व पुसद या तिन्ही तालुक्यांचा निकाल उत्कृष्ट लागला आहे.


 

Web Title: Pusad taluka class 12th result 95.17 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.