शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पुसद बाजारपेठ अखेर पूर्ववत

By admin | Updated: August 1, 2014 00:29 IST

दोन दिवसाच्या तणावानंतर गुरूवारी पुसद शहर पूर्वपदावर आले. बाजारपेठे उघडली असून खरेदीसाठी नागरिकांनी झुंबड केली होती. तसेच बुधवारी लागू करण्यात आलेला जमावबंदी आदेशही मागे घेण्यात आला.

खरेदीसाठी झुंबड : जमावबंदी आदेश हटविला पुसद : दोन दिवसाच्या तणावानंतर गुरूवारी पुसद शहर पूर्वपदावर आले. बाजारपेठे उघडली असून खरेदीसाठी नागरिकांनी झुंबड केली होती. तसेच बुधवारी लागू करण्यात आलेला जमावबंदी आदेशही मागे घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा स्वास सोडला.रमजान ईदच्या पवित्र दिवशी येथील शिवाजी चौकात वाहन पार्किंगच्या कारणावरून पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद झाला. त्यामुळे शहराची शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली. शहरात काही भागत जाळपोळ होऊन दगडफेक करण्यात आली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांची परिस्थितीवर नियंत्रण मिळवत ११ जणांना अटक केली होती. गुरूवारी सकाळी पुसद शहर पोलीस ठाण्यात एक बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू यांच्याशी चेंंबर आॅफ कॉमर्स व डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी दवाखाने व व्यापारी प्रतिष्ठानांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. तर स्थानिक भक्ती हॉटेलमध्ये ना. मनोहरराव नाईक व पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन शुक्रवारी नागपंचमी असल्याने आजपासून बाजारपेठ उघडावी या विषयावर चर्चा झाली. ना. मनोहरराव नाईक व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पदाधिकाऱ्यांनी विश्वास दिल्याने दुपारी १२ वाजता व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. दोन दिवसांपासून जमावबंदी आदेशामुळे घरात बसून असलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असून, खरेदीसाठी बाजारात झुंबड दिसून आली. बैठकीला चेंबर आॅफ कॉमर्सचे बिपीन चिद्दरवार, दीपक आसेगावकर, सूरज डुबेवार, संगमनाथ सोमावार, गिरीष अग्रवाल, अ‍ॅड़ भारत जाधव, संजय बजाज, अनंजय सोनी, किरण वानरे, अनिल ग्यानचंदाणी, ललित सेता, कैलास जगताप, भाऊ पंडीतकर, ज्ञानेश्वर शिंदे तसेच डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. सुधीर झिलपेलवार, डॉ. मधुकर नाईक, डॉ. विजय राठोड, डॉ. शैलेश नवथळे, डॉ. आरीफ अहमेद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)